Breaking News

*गडचांदूरातिल घणकचरा महाघोटाळा प्रकरण पेटनार* *नाईलाजस्तव लोकशाही मार्गाने उपोषन आनोंदलन करण्यात येत आहे :- बोरकर* *आज दिनांक 30 पासून अन्नत्याग उपोषण आज सुरु करण्यात आले*

*गडचांदूरातिल घणकचरा महाघोटाळा प्रकरण पेटनार*

*नाईलाजस्तव लोकशाही मार्गाने उपोषन आनोंदलन करण्यात येत आहे :- बोरकर*

*आज दिनांक 30 पासून अन्नत्याग उपोषण आज सुरु करण्यात आले*

कोरपना प्रतिनिधि- गौतम धोटे

कोरपना-  चंद्रपूर जिल्ह्यातील आदिवासी क्षेत्र कोरपना तालुक्यातील सर्वात मोठे शहर गडचांदूर येथील नगरपरिषदेच्या मुख्याधिकारी,नगराध्यक्षा,आरोग्य विभाग प्रमुख यांनी संगनमत करून खोट्या बिलांची रक्कम उचलून नगरपरिषदेच्या फंडाची अफरातफर केल्याचा आरोप करत येत्या 29 सप्टेंबर 2020 पर्यंत या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करावी,दोषी आढळल्यास कायदेशीर कारवाई तसेच कंत्राटदाराचा परवाना काळ्या यादीत टाकावा अन्यथा नाईलाजास्तव मला लोकशाही मार्गाने उपोषण आंदोलना सारखा मार्ग अवलंबावा लागेल असा इशारा “भीम आर्मी जिल्हा उपाध्यक्ष मदन बोरकर” यांनी कोरपना तहसीलदारांमार्फत जिल्हाधिकारी चंंद्रपूर यांना पाठवलेल्या निवेदनातून दिला आहे. या पुर्वास या दरम्यान सदरचे सुचना सर्व अधिकारी यांना दिल्यास असे सांगत आज अन्नत्याग उपोषण आजपासून दिनांक 30 /09/2020 ला दुपारी 12 . 00 स्थळ नगरपरिषद समोर गडचांदूर येथे करावे लागत आहे.

यामुळे आता येथील घनकचरा व्यवस्थापन प्रकरण पेटणार की काय ?

अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.
शहरातील कचरा उचल करणे, घंटागाडीद्वारे घरोघरी ओला-सुखा कचरा गोळा करणे,त्याचे विलगीककरण करणे,सार्वजनिक शौचालय साफसफाई करणे,अशा विविध स्वच्छतेच्या कामांचा डीपीआर मंजूर करून निविदाही काढण्यात आल्या.सदरचे काम चंद्रपूर येथील “युवक कल्याण सुशिक्षीत बेरोजगार संस्थेला मागील वर्षी देण्यात आले.न.प.च्या हातगाडी 10,नवीन 6 टाटा एस गाड्या त्याच्या स्वाधीन करण्यात आले.काही महिने काम व्यवस्थीतरित्या सुरू होते.त्यानंतर मागील 6,7 महिन्यांपासून न.प.ने दिलेल्या हात गाड्या पूर्णपणे बंद केल्या व 6 टाटा एस गाड्याद्वारे काही मोजक्या भागातला कचरा उचलला जातो.ओला-सुखा कचरा विलगीकरण केल्या जात नाही.कमी कर्मचारी लावून काम चालवतात,नागरिकांच्या तक्रारींचे निवेदन केराच्या टोपलीत टाकल्या जाते,शहरात ठिकठिकाणी अस्वच्छता पसरली आहे.डेंग्यू मलेरीया सारख्या रोगांचे रुग्ण वाढत आहे.नुकतेच डेंग्यूमुळे 2 निष्पाप मुलींचे बळी गेले आहे.सदर कंत्राटदाराकडून करारनाम्या नुसार कुठलेही काम होत नसल्याची तक्रारी होत असतानाही मुख्याधिकारी यांनी कोणतीही दंडात्मक कारवाई न करता उलट त्याचे बिल देण्यात आले.आणि आश्चर्यची बाब म्हणजे याचे कंत्राट सुद्धा सुरू ठेवण्यात आले.करारनाम्या नुसार त्याच्याकडून काम न घेता,परवाना काळ्या यादीत न टाकता कंत्राटदारा सोबत संगनमत करून करारनाम्यातील अटी व शर्तींना तिलांजली देत खोटे बिल तयार करून पूर्ण बिल कंत्राटदाराला देवून स्वतःचा स्वार्थ साधला.असे आरोप बोरकर यांनी निवेदनातून केले आहे.निवेदनाची प्रत नगरविकास मंत्री ना.एकनाथ शिंदे,आयुक्त तथा संचालक नगरपालिका संचानालय मुंबई,उपसंचालक नगरपालिका संचानालय नागपूर,माजी पालकमंत्री आमदार सुधीर मुंनगटीवार,आमदार सुभाष धोटे,माजी आमदार अँड.संजय धोटे यांना मेलद्वारे तर तहसीलदार कोरपना,गडचांदूर न.प.चे समस्त विरोधी पक्ष नगरसेवक,समस्त पत्रकार बांधवांना प्रत्यक्ष भेटून देण्यात आल्याची माहिती बोरकर यांनी माहा घडामोडी न्युज ला दिली आहे. पुर्वीच्या निवेदनात दिली होती .आता दिलेल्या मुदतीत सदर प्रकरणाची चौकशी करण्यात येते नसल्याने बोरकर यांना अन्नत्याग उपोषण करावे लागत आहे .या आंदोलनाचा मार्ग अवलंबतात याकडे सर्वांचे लक्ष विशेष लागले आहे.

यावेळी अशोककुमार उमरे .सचिव गडचांदूर संघर्ष समीती .तथा प्रचारक रिपब्लिकन जाग्रुती अभियान.. हेमंतभाउ वैरागडे. माजी .सभापती चंद्रपूर . हंसराज चौधरी.वापारी अषोशन गडचांदूर. सुरेद्र कोमावार. या अरून डोहे नगरसेवक गडचांदूर यांनी उपोषण करत्याचा उपोषण स्थळाला आदी नी भेटी दिल्या आहे.

Check Also

*नन्ही रोजेदार – कु.जामिया जमिर शेख*

🔊 Listen to this *नन्ही रोजेदार* सावनेर ः पवित्र रमजान के अवसरपर शहरकी पाच वर्षीय …