Breaking News

*गावो गावी सी सी टिव्ही कैमेरे बसवावे* *पोलीस पाटलांची मागणी*

*गावो गावी सी सी टिव्ही कैमेरे बसवावे*


*पोलीस पाटलांची मागणी*

पोलीस पाटील म्हणजे जन हिताचा नारा…..
पोलीस पाटील म्हणजे रात्री एकटाच अंधारात चमकनारा तारा……
पोलीस पाटील म्हणजे फिरता वारा…..
पोलीस पाटील म्हणजे रात्री चा पहारा…..
पोलीस पाटील आहे सुख अन् दुःखाचा सहारा…..
एवढे सगळे संबोधन गावातील एकेट्या पोलीस पाटील पदाला लावले जातात…..


विषेश प्रतिनीधी – दुर्गाप्रसाद पांडे

नागपुर – महाराष्ट्र ग्राम पोलीस अधिनियम १९६७चे अधिनियम ८६अन्वये पोलीस पाटील गाव पातळीवर कार्यकारी दंडाधिकारी यांचे आदेशान्वये कार्य करत असतात, गावातील अपराधाचे प्रमाण व समाज स्वास्थ या बाबद ची माहिती पुरविणे ,गावात नैसर्गिक किंवा मानव निर्मित आपत्ती चे समयी या बाबद ची माहीती पोलीसांना पुरवीणे यावरून गावात पोलीस पाटील या पदाचे महत्व व कर्तव्य समजून घ्यावे लागेल, आता कोंढाळी अंतरगत पोलीस पाटील संघटनांचे सदस्यांनी आप आपल्या गावात शांतता व सुव्यवस्था राखण्या साठी तसेच बरेचदा अन्य प्रांतातून गुन्हे करून गुन्हेगार अगदी गावापर्यंत फरार होऊन लपन्यासाठी येतात व बिन बोभाट वास्तव्य ही करतात, यावर नियंत्रण बसावे सोबतच रात्री अप रात्री ग्रामीण व जंगल लगत भागातील गावांसह अन्य सर्वच गावात सी सी टि व्ही कैमेरे बसविण्यात यावे, व तेही सी सी टिव्ही कैमेरे ग्रामसुधार योजनेचे 15वे वित्त आयोगातून बसवून देण्तात यावे अशी मागणी वाई व रिंगणाबोडी चे पोलीस पाटील राजेंद्र कराळे , संजय नागपुरे यांनी आप आपल्या ग्रा प चे सरपंच व ग्राम सचीव यांना पत्र देऊन गावात शांतता व सुरक्षित रहावे या करीता मागणी पत्र दिले आहे. .

Check Also

*नन्ही रोजेदार – कु.जामिया जमिर शेख*

🔊 Listen to this *नन्ही रोजेदार* सावनेर ः पवित्र रमजान के अवसरपर शहरकी पाच वर्षीय …