*मोवाड नगरपरीषदेला कोणी मुख्याधिकारी देता का ,
मुख्याधीकारी ?… नागरीकांची ओरड..!*
नरखेड प्रतिनिधि – श्रीकांत मालधुरे
मोवाड – एक नव्हे , दोन नव्हे तर सलग तीन महीण्यापासुन नरखेड तालुक्यातील मोवाड या नगरपरीषद कार्यालयातील मुख्याधीकारी तसेच महत्वाच्या टेबलवर काम करणारे बांधकाम अभियंता ,
पाणीपुरवठा अधीकारी , तसेच प्रोग्राम अभीयंता या चार अधिकार्यांची लाॅकडाऊन काळातच बदली झाल्याने येथील नगरपरीषदेची कार्यप्रणाली यंत्रणा प्रभावीत
झाली आहे. सलग तीन महीण्यापासुन ऐन
कोरोना लाॅकडाऊन काळातच या महत्वाच्या
अधिकार्यांचे बदली सत्र सुरू झाले खरे ,मात्र
अद्यापपर्यंत बदली झालेल्या अधीकार्यांच्या
जागी दुसरे अधीकारी आले नसल्याने मोवाड
नगरपरीषद कार्यालय सद्यस्थीतीत रामभरोसे
असल्याचे चित्र दिसत आहे, तथापी मोवाड
नगरपरीषदेला आता कोणी मुख्याधिकारी देता का मुख्याधीकारी ? अशी ओरड येथील नागरीकांची आहे.
विशिष्ट कामासाठी व महत्वाचे
कागदपत्रे मागण्यासाठी येथील कार्यालयात नागरीक गेले असता तेथील कर्मचारी कोणतीही
शासकीय अट घालुन त्यांना परत करण्याचे प्रकार येथे घडत आहेत. कागदपत्रांसाठी रोज
मजुरी सोडुन कामे होत नसल्याने येथील नागरीकांत नगरपरीषदेविषयी चिड निर्माण
होत आहे. सद्यस्थीतीत नरखेड नगरपरीषदेच्या
मुख्याधिकार्याकडे येथील कार्याचा तात्पुरता
प्रभार सोपविण्यात आला आहे, परंपु तेथेही
कामाचा मोठा ताण व दररोज कोरोनाचे रूग्ण
निघत असल्याने ते मोवाडला क्वचीतच येतात.
त्यामुळे मोवाड नगरपरीषदेत पुर्णकालीन
मुख्याधिकारी केंव्हा येणार? असा सवाल आता नागरीक विचारू लागले आहेत.
येथील नगरपरीषदेत कर्मचार्यांची ऊणीव असल्याने आठवडी
बाजाराचे व्यवस्थापन बिघडले आहे. त्याकडे
लक्ष द्यायला आता कुणीच तयार नाही. येथील
आठवडी बाजार
परीसर सौंदर्यीकरणाने परीपुर्ण असुन मोवाडचा बाजार हा तालुक्यातील अव्वल दर्जाचा व मोठा बाजार
आहे. येथील कापडाचा व स्टील भांड्यांचा
व्यवसाय प्रसीध्द आहे, मात्र कोरोना लाॅकडाऊन काळात तो पुर्णपणे बंदच होता.
नागरीकांच्या मागणीखातर कोरोना फाईटरच्या
देखरेखीत तत्कालीन मुख्याधिकारी सिध्दार्थ
मेश्राम यांच्या आदेशाने नुकताच मीनी गुजरी
बाजार म्हणुन सुरू करण्यात आला होता.
लाॅकडाऊन लक्षात घेता आठवडी बाजाराचा
लिल्लाव झाला नसल्याने आता कोणीही व
कोणत्याही जागी बसुन आपला व्यवसाय
करायला लागला आहे. परंतु जो — तो मुख्य
जागेवरच येऊन बसत असल्याने जुन्या व नव्या
व्यावसायीकांत भांडणे होण्याचा प्रकार घडत
आहे. नगरपरीषदेकडे जागेची मागणी करण्यासाठी गेले असता तेथील कर्मचारी मुग
गीळून बसले अाहेत. सात आठ महीण्यापासुन
घनकचरा व्यवस्थापणाचे बिलच निघाले नाही.
कंत्राटदार ऊधारवाडी व व्याजाने पैसे काढुन
कसेतरी मजुरांचे गुजरान करणे सुरू आहे. न.
प. फंडात पैशाची ऊणीव निर्माण होऊन घंटागाड्यात डीझेलची कमतरता निर्माण होऊन त्या आठ दहा दिवस बंद असतात. घंटागाड्या येत नसल्याने घराघरात कचरा जमा असल्याचे चित्र बघायला मिळत आहे. तुर्त
कसेतरी घनकचर्याचे व्यवस्थापन सुरू आहे.
येथील नगरपरीषदेचा कार्यकाळ
गेल्या एप्रील महीण्यातच संपुष्टात आला आहे.
तेंव्हापासुन कोणत्याही निवडनुकीचा बिगुल
अद्यापपर्यंत वाजलेलाच नाही. नगरपरीषद रीकामी , कोरोना संसर्ग तसेच रोजमजुरीचा प्रश्न या चहुबाजुंनी येथील नगरवासी चेपले
असुन स्वैरभैर झालेले आहेत. आता या गावात
कोरोनाचे दररोज दोन तीन रूग्ण निघत आहेत.
प्राथमिक आरोग्य केंद्रातील कर्मचार्यावरच त्याचा सगळा भार असुन ते आपले कर्तव्य
योग्यरीत्या पार पाडत आहेत, मात्र येथील
नगरपरीषदेकडे सध्या कोणतेही शासन किंवा
राजकीय पक्षाच�
दिसत नसल्याने उद्भवलेल्या या गंभीर बाबींकडे विशेष लक्ष
पुरऊन मोवाड परीषदेत मुख्याधिकारी व ईतर
महत्वाचे कर्मचारी पाठविण्याची मागणी जोर
धरू लागली आहे.
Maharashtra News Media सच की आवाज