*वाचनाने व्यक्तीच्या ज्ञानात भर पडते :डॉ.वर्षा वैद्य*
*नागपुर उपजिल्हा प्रतिनिधी दिलीप येवले*
नागपुर:- आज आपण ज्ञानात कुठेतरी कमी पडत आहो असे आपल्याला जाणवते, परंतु याचा आपण शोध घेत नाही.कारण आपण मर्यादित ज्ञानाकडे वळलो आहे याची आपण स्वत: शहानिशा करणे गरजेचे झाले आहे.आज आपण इंटरनेटचा वापर आपल्या गरजेतुन करीत आहे.त्यामुळे आपल्याला आवश्यक तेवढेच ज्ञान मिळत आहे.आज सर्वांनी पुस्तकी ज्ञानाकडे दुर्लक्ष केले आहे.पुस्तकी वाचन कोणीही करत नाही.त्यामुळे आपल्याला परिपुर्ण ज्ञान प्राप्त होत नाही,ही एक चिंतेची बाब आहे .म्हणून आपण पुस्तकी वाचनाकडे आपले लक्ष केंन्दित केले पाहीजे.हिच काळाची गरज आहे.डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम यांनी म्हटल्याप्रमाणे “वाचाल तर वाचाल ” याची आपल्याला गरज आहे.असे वक्तव्य या कार्यक्रमाच्या अनुषंगाने डॉ.वर्षा वैद्य यांनी व्यक्त केले.
तायवाडे महाविद्यालय महादुला-कोराडी येथे डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम यांच्या जयंती निमित्त ग्रंथालय समितीच्या वतीने “वाचन प्रेरणा दिन ” साजरा करण्यात आला.या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयातील इंग्रजी विभागप्रमुख डॉ .वर्षा वैद्य या होत्या.त्यांनी डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम यांच्या जीवनीवर प्रकाश टाकला.या कार्यक्रमाचे संचालन महाविद्यालयातील ग्रंथपाल कू.मंजुषा मामिलवार यांनी तर आभार प्रदर्शन प्रा.सुनिल घुगल यांनी केले.या कार्यक्रमाला महाविद्यालयातील प्राध्यापक वृंद व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित हाेते.
Maharashtra News Media सच की आवाज