*शेतकरी विरोधी कायदे रद्द करण्यासाठी शेतकरी बचाव व शेतकरी स्वाक्षरी मोहीम*
गढ़चिरोली प्रतिनिधि – सूरज कुकुड़कर
धानोरा – काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष तथा माजी आ. डॉ नामदेव उसेंडी व जिल्हा परिषद उपाध्यक्ष मनोहर पोरेटी यांच्या पुढकारातून शेतकरी विरोधी तीन काळे कायदे रद्द करण्यासाठी धानोरा येथे शेतकरी बचाव व शेतकरी स्वाक्षरी मोहीम राबविण्यात आली.
केंद्र सरकारने देशातील शेती व शेतकरी यांच्या विरोधात मोठे षडयंत्र रचले आहे. शेतकरी विरोधी तीन काळे यांच्या माध्यमातून देशातील हरित क्रांती नष्ट करण्याचा कुटील डाव रचला आहे. जगाचा पोशिंदा, अन्नदाता शेतकरी व शेतमजूर यांना काही उद्योगपतींचे गुलाम बनविण्याचे हे एक मोठे षडयंत्र आहे. सविधान, संसदीय प्रणाली, संघराज्य व्यवस्था या सर्वांना धाब्यावर बसवून कोणतेही चर्चा अथवा संवाद न करता मोदी सरकारने बहुमताच्या जोरावर हे तीन काळे कायदे मंजूर करून घेतले आहेत.
शेतकºयांच्या हक्कासाठी, संघर्ष हक्कासाठी, शेतकºयांच्या भविष्यासाठी नवीन शेती विषयक तीन काळे कायदे रद्द करण्यात यावी. याकरीता हुकुमशाही केंद्र सरकार विरोधात गडचिरोली जिल्हा भर शेतकरी बचाव तसेच शेतकरी स्वाक्षरी मोहीम सुरू केली आहे. याच पार्श्वभुमीवर धानोरा येथेही सदर मोहिम राबविण्यात आली.यावेळी गडचिरोली जिल्हा कॉंग्रेस कमिटी गडचिरोली व गडचिरोली जिल्हा कॉंग्रेस चे जिल्हाध्यक्ष डॉ. नामदेव उसेंडी, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष मनोहर पोरेटी यांनी धानोरा, मुरूमगाव, सावरगाव, कोटगुल, कोरची, कुरखेडा दौरा करून विविध ठिकाणी भेट देऊन तेथील स्थानिक समस्या, विविध बांधकामांची पाहणी व तेथील स्थानिक नागरिक, तालुका अध्यक्ष, आजी माजी सदस्य, पदाधिकारी व कार्यकर्ते तसेच प्रामुख्याने शेतकरी व शेतमजूर यांना हे तीन काळे कायदे विषयी माहिती सांगून ते तीन काळे कायदे रद्द करण्यात यावी अशी माहिती दिले.
त्यानंतर कॉंग्रेस कमिटीचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांना माहिती सांगून प्रत्येक बूथ स्थरावर शेतकरी विरोधी विधेयक विरोधात शेतकरी स्वाक्षरी मोहीम राबवण्यात यावी, असे यावेळी डॉ. नामदेव उसेंडी यांनी सांगितले. या दौºयादरम्यान जिल्हा परिषद सदस्य विनोद लेनगुरे, माजी सदस्य पंचायत समिती परसराम पदा, संजय गावडे, सदुकर हलामी, कौशिक धूर्वे उपस्थित होते.
Maharashtra News Media सच की आवाज