*पिंपळगाव (राऊत) अनेक विकास कामापासुन वंचीत*

*गावकर्यांची ओरड*
नरखेड तालुका प्रतिनिधि – श्रीकांत मालधुरे
नरखेड – तालुकांतर्गत येत असलेले व अत्यंत दुर्गम भागात वसलेले पिंपळगाव (राऊत) हे ग्रामपंचायतीचे गाव अनेक विकासकामापासुन वंचीत असुन शासकिय कामाकडे शासनाचेच दुर्लक्ष होत असुन या गावाकडे कोणी लक्ष देईल काय ? असा सवाल तेथील ग्रामस्थांनी उपस्थीत केला आहे. पिंपळगाव (राऊत) हे गाव जवळपास १००० लोकवस्तीचे व अतिशय दुर्गम भागात वसलेले छोटेसे गाव असुन तेथे गावात जाण्यासाठी किंवा दळणवळणाकरीता धड पक्के रस्ते नाहीत. भारतात स्वच्छ अभीयान सुरू असतांना नाल्यांची व्यवस्थीत साफसफाई नाही.
कुठेकुठे नाल्या तर सिमेंटच्या पाईपसारख्या बांधण्यात आल्या. तसेच गावात शिरताच रस्त्यातच शेणाचे उकीरडे व उघड्यावरच शौच्छालयाला तेथील ग्रामस्थ बसत असल्याने परीणामी डेंगु , मलेरीयासारख्या अनेक आजारांना आमंत्रणच असल्याची तेथील सुज्ञ ग्रामस्थांची ओरड आहे. गावात महाराष्र्ट राज्य परीवहनाच्या गाड्यांचे व्यवस्थीत थांबे नाहीत. बस स्टाॅपची दुर्दशा झाली आहे. सध्या संपुर्ण भारतभर कोरोना या आजाराची साथ असल्याने स्वच्छता अत्यंत महत्वाची असुन तेथील लोकप्रशासनाचे दुर्लक्ष दीसत आहे. गावातील शेतकर्यांना आपल्या शेतात ऊत्पादीत झालेला कच्चा माल मोठ्या बाजारात पोहचवीण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागत असते. लाॅकडाऊनआधी बांधण्यात आलेले सिमेंट रस्ते निकृष्ठ दर्ज्याचे बांधण्यात आले असल्याने त्यावर आता भेगा पडलेल्या आहेत. यासंदर्भात अनेक निवेदने दीली परंतु त्याकडे कोणीच लक्ष देत नसल्याची गावकर्यांची ओरड आहे. कोरोना लाॅकडाऊनची संधी साधुन करण्यात आलेली बांधकामे व्यवस्थीत झाली नसल्याची गावकर्यांची तक्रार आहे. अशा नानाविध समस्यांनी सध्या गावाला विळखा घातला असल्याने शासनाच्या दुर्लक्षीत धोरणाने या गावाचा विकास खुंटीला टांगला आहे. पिंपळगाव (राउत) या गावाकडे शासनाने लक्ष केंद्रीत करून तेथील समस्यांचे निराकरण करावे अशी मागणी गावातील असख्य ग्रामस्थांनी केली आहे.
Maharashtra News Media सच की आवाज