*वर्धा जिल्ह्यात मास्क, सॅनिटायझर, सोशल डिस्टन्सिंग चा उडविला फ़ज्जा*
*महसुल विभाग बेफिकीर*
वर्धा प्रतिनिधि – पंकज रोकडे
आर्वी- सध्या महसुल विभाग बेफिकीर झाल्याचे दिसत आहे. मास्कचा वापरच केला जात नसल्याचे दिसून येत आहे. शिवाय मास्क घातला तरी तो हनुवटीवरच असलेला दिसून येतो. त्यामुळे संसर्ग टाळण्यासाठी व्यवस्थित मास्क घालणे गरजेचे आहे. महसूल विभाग, पोलिसांनी कारवाई सुरू केली पाहिजे मास्कचा वापर केला जात नाही ते अयोग्य नाही आपला जीव वाचविण्यासाठी मास्क, सॅनिटायझर, सोशल डिस्टन्सिंग हे उपाय वापरले पाहिजेत. मास्कच्या वापरासह वारंवार हात धुणे हाही प्रभावी उपाय आहे.
*गेल्या काही दिवसांपासून जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या कमी होताना दिसत आहे. त्यामुळे थोडा दिलासा मिळत असल्याची चिन्हे असली तरी नागरिकांनी लगेच निर्धास्त होणे धोक्याचे आहे. कारण कोरोना संसर्गाचे संकट अजून कायम आहे. काळजी घेतली नाही तर ते पुन्हा वाढण्याचाही धोका आहे. कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी मास्कचा वापर अनिवार्यच आहे. मास्क वापरा अन् कोरोना पळवा अशी मोहीमच आता वर्धेकरांनी सुरू करण्याची आवश्यकता आहे. मे मध्ये कोरोनाचा जिल्ह्यात शिरकाव झाला. ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात उच्चांकी रुग्णसंख्या होती. मात्र गेल्या काही दिवसांपासून वर्धेकरांनी थोडा दिलासा मिळतो आहे. जिल्हा प्रशासनाने मास्कचा वापर अनिवार्य केला आहे. त्यातच पोलिसांनी विनामास्क फिरणाऱ्यांवर दंडात्मक कारवाईही सुरू ठेवली आहे. त्यामुळे नागरिक मास्कचा वापर करीत आहेत. त्याचाही चांगला परिणाम दिसून येत आहे.
सध्या अनेकजण बेफिकीर झाल्याचे दिसते आहे. मास्कचा वापरच केला जात नसल्याचे दिसून येत आहे. शिवाय मास्क घातला तरी तो हनुवटीवरच असलेला दिसून येतो. त्यामुळे संसर्ग टाळण्यासाठी व्यवस्थित मास्क घालणे गरजेचे आहे. महसूल विभाग, पोलिसांनी कारवाई सुरू केल्यानंतर मास्कचा वापर केला जातो. ते अयोग्य आहे. आपला जीव वाचविण्यासाठी मास्क, सॅनिटायझर, सोशल डिस्टन्सिंग हे उपाय वापरले पाहिजेत. मास्कच्या वापरासह वारंवार हात धुणे हाही प्रभावी उपाय आहे. बाहेरून आल्यानंतर, खरेदी केल्यानंतर, जेवणापूर्वी साबणाने हात धुणे अत्यावश्यक आहे.
सध्या अनेकजण बेफिकीर झाल्याचे दिसते आहे. मास्कचा वापरच केला जात नसल्याचे दिसून येत आहे. शिवाय मास्क घातला तरी तो हनुवटीवरच असलेला दिसून येतो. त्यामुळे संसर्ग टाळण्यासाठी व्यवस्थित मास्क घालणे गरजेचे आहे. महसूल विभाग, पोलिसांनी कारवाई सुरू केल्यानंतर मास्कचा वापर केला जातो. ते अयोग्य आहे. आपला जीव वाचविण्यासाठी मास्क, सॅनिटायझर, सोशल डिस्टन्सिंग हे उपाय वापरले पाहिजेत. मास्कच्या वापरासह वारंवार हात धुणे हा ही प्रभावी उपाय आहे.*
Maharashtra News Media सच की आवाज