*बॅंकेच्या तांत्रिक चूका शेतकर्याचे मुळावर*
*शेतकरी साहेबराव घागरे कृषी पीक करण्यापासून वंचीत*
*पालकमंत्री -जिल्हाधिकारी- डी डी आर कार्यालय न्याय मिळवून देणार काय?*
*स्टेट बैंकेचा आडमुठे पणा*
विशेष प्रतिनिधि
कारंजा (घा) / वर्धा- नागपुर जिल्ह्याच्या सीमेवरील कारंजा (घा)तालुक्यातील काजळी येथील स्टेट बैंक आफ इंडीया शाखा काजळी येथील बैंक अधिकारीकार्यांचे चुकी चा फटका येथील साहेबराव घागरे नामक शेतकर्याला बसला आहे. या शेतकर्याने कृषी पीक कर्जा साठी सर्व नियम वअटींचे पालन करत काजळी येथील एस बी आय बैंके कडे अर्ज केला. मात्र साहेबराव घागरे ला आज पर्यंत ही पीक कर्ज देण्यास बैंक मॅनेजर एस बी आय शाखा काजळी कडून झालेली तांत्रिक चुकी चा हवाला देत हे पीक कर्जा करीता वर्धा जिल्हानिबंधकाकडे बोट दाखवत आहेत.
खरे तर साहेब राव घागरे यांचे मागील पीक कर्ज राज्य सरकार चे छत्रपती शिवाजी महाराज पीक कर्ज माफी योजनेत माफ झाले तरी ही काजळी चे एस बी आय बैंक शाखा व्यवस्थापक यांचे कडून साहेब राव घागरे या शेतकर्याला त्यांचे पीक खाते दुरुस्ती करीता फाईल वरिष्ठ कार्यालयाकडे पाठविल्याचे सांगत आहेत. या उलट साहेब राव घागरे यांचे वर कर्जाची नोंदणी त्यांचे कुटुंबीयांचे नांवावर दाखविली यांची ही कर्ज माफी झाली तसेच त्यांना नवीन पीक कर्ज ही मिळाले मात्र साहेब राव घागरे यांना अजूनही पीक कर्ज मिळाले नाही. या करिता साहेबराव यांनी खाजगी सावकाराचे दारावर जाऊन कर्ज घेण्यास नाईलाज झाला आहे.
*आता! करणी (चुकि) बैंकेची तर!भरणी शेतकार्याला*
भोगावे लागत आहे.
या करिता जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार सुनील जी केदार तसेच जिल्ह्याचे जिल्हाधिकारी व डी डी आर वर्धा काजळी चे शेतकरी साहेबराव घागरे कृषी पीक मिळवून देतील काय?
या प्रकरणी काजळी बैंकेचे व्यवस्थापक यांचे सोबत संपर्क केला असता सांगितले की साहेबराव घागरे यांचे प्रकरण वरिष्ठ कार्यालयाकडे पाठविले आहे.
या प्रकरणी शेतकरी साहेबराव घागरे यांनी पालक मंत्री,- वर्धा , जिल्हाधिकारी-वर्धा, डी डी आर वर्धा, यांचे कडे समाज माध्यमातून (वाटसापवर )तक्रार करन्यात आली आहे.
Maharashtra News Media सच की आवाज