Breaking News

*तब्बल सात महिन्यानंतर भरला देवलापार चा आठवडी बाजार* *मास्क व सामाजिक अंतराचे पालन करण्याची गरज*

*तब्बल सात महिन्यानंतर भरला देवलापार चा आठवडी बाजार*

*मास्क व सामाजिक अंतराचे पालन करण्याची गरज*

देवलापार प्रतिनिधी – पुरुषोत्तम डडमल

देवलापार – येथील आठवडी बाजार लॉक डाऊन च्या आधी दर मंगळवारला नित्यनियमाने भरला जात होता.परंतू कोरोना महामारीचा वाढत प्रभाव बघता शासनाद्वारे मार्च महिन्यापासून आठवडी बाजार भरवण्यास बंदी घालण्यात आली होती.तेव्हा पासून देवलापारचा आठवडी बाजार भरलाच नाही.पण आज २७ ऑक्टोबर मंगळवारला तब्बल सात महिन्यानंतर हा आठवडी बाजार भरल्याने परिसरातील नागरिकांनी जीवनावश्यक वस्तू खरेदी करणे साठी दुकानात तोबा गर्दी केली होती.


बाजाराचा फेरफटका मारला असता असे लक्षात आले की, बाजारातील गर्दीवर कुणाचे ही नियंत्रण नव्हते. बाजारात खरेदीला येणाऱ्या बहुतेक नागरिकांनी मास्कचा वापर केला नव्हता.तसेच सामाजिक अंतर ही पाळल्या गेले नाही.या बाबीकडे स्थानिक ग्रामपंचायत प्रशासन लक्ष देईल काय?असा प्रश्न उपस्थित होतो.
सन २०२०-२०२१ या वर्षाकरीता जिल्ह्यातील जि.प. मालकीचे आठवडी बाजाराचा लिलाव घेण्यात आले होते परंतु कोव्हिड -19 मुळे बाजार ठेकेदारनी लिलाव प्रकीया पुर्ण न केल्याने बाजार लिलावसंबंधी जिल्हा परिषदकडे जमा केलेली लिलाव रककम परत मागीतल्यामुळे ती रक्कम त्यांना परत करण्यात आली.
त्यामुळे येथील बाजार बंद असले तरी अंशत :अथवा किरकोळ स्वरूपात भरत असलेला बाजार व बाजारातील दुकाने, गुजरी येथील बाजारपट्टीची वसुली ग्रामपंचायत मार्फत करून ग्रामपंचायतने बाजारपट्टी वसुलीची २५ टक्के रक्कम बाजाराची देखभाल व बाजार विकास त्याअनुषंगाने आवश्यक कामावर खर्च करावी व ७५ टक्के रक्कम गट विकास अधिकारी याचे मार्फत जि.प.सेस फंडाचे उत्पन्नात जमा करण्यास निर्देश देण्यात आले आहे.अशा स्वरूपाचे पत्र रामटेक पंचायत समिती गट विकास अधिकाऱ्या मार्फत २०ऑक्टोबर ला पत्र क्रमांक-३२४५/२०२० कमांक / पंसरा / वि.अ .( सा )/ कार्यालय – पचायत समिती रामटेक या प्रमाणे ग्राम पंचायत ला पाठविण्यात आले आहे.
त्यानुसार पंचायत समितीमधील विस्तार अधिकारी ग्रामपंचायत सचिव व कर्मचारी यांचे पथक गठीत करून सदर पथका मार्फत आज बाजार पट्टी वसुल करण्यात येत आहे.

ग्राम पंचायत प्रशासन मास्क व सामाजिक अंतराकडे लक्ष देईल काय?

आज बाजार भरल्याने जीवनावश्यक वस्तू, अन्न, धान्य खरेदी करणे साठी गर्दी केली होती. त्यामुळे सामाजिक अंतराचा फज्जा उडाला होता. तसेच बाजारात खरेदीला येणारे नागरिक ही विना मास्क बेधडक वावरतांना आढळून आले.त्यामुळे ग्राम पंचायत प्रशासनाने खबरदारी म्हणून या गंभीर बाबीकडे लक्ष देवून बाजारात येणाऱ्या नागरिकांनी मास्क वापरणे व सामाजिक अंतराचे पालन करण्याची गरज असल्याची बाब जाणकारांनी व्यक्त केली.

Check Also

*सुनील केदार यांनी मुस्लिम बांधवांना ईदच्या शुभेच्छा दीला*

🔊 Listen to this *सुनील केदार यांनी मुस्लिम बांधवांना ईदच्या शुभेच्छा दीला* मुख्य संपादक – …