*गडचिरोली जिल्हयात सर्वसामान्य नागरिकांना आयुष्मान भारत योजनेचे कार्ड तयार करून देण्यासाठी आमदार डॉ देवराव होळी यांचा पुढाकार*

*सर्वसामान्य जनतेचे आयुष्मान भारत योजनेचे कार्ड तयार करून स्वतः विविध गावखेड्यात व प्रभागात जाऊन करीत आहेत वाटप*
गडचिरोली प्रतिनिधि – सूरज कुकुडकर
गढ़चिरोली – जागतिक महामारी कोरोनाच्या काळात लोकांना आरोग्य सेवेची तथा आरोग्य योजनेची नितांत गरज असते आपल्या राज्यात 2 जुलै 2012 पासून महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना (पूवीची राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजना) सुरू झाली, ही योजना सध्या राज्यात 996 आजारावर 1.5 लाख पर्यंत मोफत उपचार व शस्त्रक्रिया सर्व जनतेला (सर्व रेशनकार्ड धारकाना) मोफत आहे. तसेच किडनी ट्रान्सप्लान्टसाठी 2.5 लाख पर्यंत मोफत र्शस्त्रक्रिया आहे. तसेच 23 सप्टेंबर 2018 पासून संपूर्ण भारतात आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना सुरू झाली त्यात 1300 आजारावर पाच लाख पर्यंत प्रती वर्ष प्रती कुटुंब मोफत उपचार शस्त्रक्रिया आहेत. ज्या कुटुंबाचे नाव सामाजिक आर्थिक जातनिहाय जनगणना 2011 च्या यादीत नाव असेल त ्यांना गोल्डन कार्ड CSC / VLE / सेवा केंद्रात जाऊन प्रधानमंत्री पत्र किव्हा रेर्शन कार्ड तसेच आधारकार्ड ने तयार कराचे आहे हे लाभार्थी या योजनेत पात्र आहेत आपल्या गडचिरोली जिल्हात एकूण 1,48,554 कुटुंब या योजनेत पात्र आहेत. 1 एप्रिल 2020 पासून या दोन्ही योजना एकत्रित राज्यात राबवल्या जात आहे.जागतिक महामारी कोरोनाच्या काळात ही योजना नवसंजीवनी ठरणार आहे, कारण या योजनेत 20 कोरोना आजारावर मोफत उपचार व शस्त्रक्रिया आहेत सध्या जनतेची या कोरोंना काळात आर्थिक बाजू खूप कमजोर झाली आहे, समोर आपणाला व आपल्या परिवाराला कोणताही आजारासाठी तसेच शस्त्रक्रिया करिता पैसे मोजावे लागणार नाही त्यासाठी या गोल्डन कार्ड ची सर्वसामान्य गोरगरीब जनतेला गरज असणार आहे, तरी ज्या कुटुंबाचे नाव आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेत असेल त्यासर्व कुटुंबाने या योजनेचे कोरोनाचे मार्गदर्शक नियमाचे पालन करून गोल्डन कार्ड तयार करून घ्यावे व जास्तीत जास्त या योजनेचा लाभ लाभार्थयाांनी घ्यावा व या योजनेचा लाभ घेण्यासाठी अथवा आयुष्मान भारत योजनेचे कार्ड तयार करण्यासाठी अडचण आल्यास आमदार जनसंपर्क कार्यालय गडचिरोली अथवा चामोर्शी येथे संपर्क साधावा असे आवाहन गडचिरोली विधानसभा मतदार संघाचे मा.आमदार देवरावजी होळी यांनी जनतेला केले आहे.
Maharashtra News Media सच की आवाज