Breaking News

*मोवाड येथील कोल्हापूरी बंधाऱ्याचे गेट कधी लागणार ?* *पाठबंधारे विभागाचे दुर्लक्ष – स्थानिक नेत्यांनी द्यावे लक्ष*

*मोवाड येथील कोल्हापूरी बंधाऱ्याचे गेट कधी लागणार ?*

*पाठबंधारे विभागाचे दुर्लक्ष – स्थानिक नेत्यांनी द्यावे लक्ष*

नरखेड प्रतिनिधी – श्रीकांत मालधुरे

मोवाड – येथील कोल्हापूरी बंधा-याचे अजून पर्यत गेट खुले असल्याने शेतकरी चिंतेत आला आहे. पावसाळा संपुण १ महीना झाला आहे. वर्धा नदी मंद अवस्थेत वाहत आहे. मोवाड शिवारातील शेतीला पाणिपुरवठा करणाऱ्या बंधा-याचे अजून पर्यंत गेट बंद झाले नाही. वर्धा नदीच्या पाण्यावर मोवाड शहराच्या पिण्याच्या पाण्याची व्यवस्था अवलंबून आहे.

कोल्हापूरी बंधा-याचे गेट न लागल्याने शहरात पाण्याचे संकट येईल अशी परिस्थिती निर्माण होईल . व संत्रा उत्पादक शेतकरी यांना पाण्या अभावी संत्रा बागा वाळेल की काय अशी चिंता निर्माण होत आहे.

दर वर्षी या कोल्हापूरी बंधा-यावर पाठबंधारे विभागाचे दुर्लक्ष आहे. त्यामुळे शहरातील शेतकरी चिंतेत आहे. तरीही या कोल्हापूर बंधारे चे तात्काळ दरवाजे लावावेत अशी मागणी मोठ्या प्रमाणावर मोवाड शहरातील शेतकऱ्यांना कडून जोळधरत आहे.

Check Also

*उपाध्यक्ष बने राजु घुगल* *डॉ. विजय धोटे व मंदार मंगळे स्विकु्त नगरसेवक* *नगराध्यक्षा व नगरउपाध्यक्ष ने बनाया इतिहास*

🔊 Listen to this *उपाध्यक्ष बने राजु घुगल* *डॉ. विजय धोटे व मंदार मंगळे स्विकु्त …