*भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना कोंढाळीत आदरांजली*

कोंढाळी प्रतिनिधि – दुर्गाप्रसाद पांडे
कोंढाळी – महापरिनिर्वाण दिवस हा डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा स्मृतिदिन (पुण्यतिथी) आहे। महामानवाचे ६ डिसेंबर १९५६ रोजी दिल्ली येथे निधन झाले होते, याच्या दुसऱ्या दिवशी ७ डिसेंबर रोजी मुंबईतील चैत्यभूमी येथे त्यांच्यावर बौद्ध पद्धतीने अंतिमसंस्कार करण्यात आले. निधनानंतर त्यांचे पार्थिव मुंबईला दादर येथील राजगृहावर आणण्यात आले. शिवाजी पार्क येथील समूद्रकिनारी असलेल्या हिंदू स्मशान भूमीमध्ये ७ डिसेंबर १९५६ रोजी १२ लाख अनुयायांसमक्ष त्यांच्यावर बौद्ध पद्धतीने अंतिम संस्कार करण्यात आला. नंतर काही वर्षांनी आंबेडकरांच्या पवित्र अस्थीवर चैत्य उभारण्यात आला.
महापरिनिर्वाण दिनानिमित्त मुंबईतील त्यांचे समाधीस्थळ असलेल्या चैत्यभूमी येथे भारतभरातून लक्षावधी लोक येतात. सर्व चैत्यभूमी स्तूपात ठेवलेल्या आंबेडकरांच्या अस्थीकलश व प्रतिमेस अभिवादन करतात व बाबासाहेबांचे दर्शन घेतात. या दिवशी जगभरातील आंबेडकरवादी व्यक्ती आंबेडकरांची प्रतिमा व मुर्ती समोर ठेवून त्याच्या स्मृतीस अभिवादन करतात. स्थानिक बौद्ध विहारे, घरात, सार्वजनिक स्थळी, शाळा-महाविद्यालये, शासकिय कार्यालये इ. या ठिकाणी या दिवशी त्यांना अभिवादन करतात. अशी माहीती राष्ट्रवादी विद्यार्थी कांग्रेस पार्टी चे जिल्हाध्यक्ष आकाश गजबे यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांचे कोंढाळी येथील जनसंपर्क कार्यालयात महापरिनिर्वाण दिनी आयोजीत पुण्यस्मरण प्रसंगी बोलत होते।
या प्रसंगी कार्यक्रमाचे प्रमुख कोंढाळी चे सरपंच केशवराव धुर्वे, उपसरपंच स्वप्निल व्यास, ज्येष्ठ ग्रा प सदस्य कमलेश गुप्ता, संजय राऊत, राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी चे दुर्गाप्रसाद पांडे, नितीन ठेवळे, आकाश गजबे, प्रशांत खंते, अंकित चव्हान, सागर राठी, अतुल ठाकरे, अरूण आष्टणकर, समशेर शेख, चंद्रशेखर चरडे, भावेश पवार, सदाप पठाण, राकेश पांडे, विष्णु कळसाईत, रूपेष बुरडकर, मोहसीन पठान, हितेश चामलाटे, रत्नाकर साखरकर, उजेर हुसेन, सह ग्रामीण भागातील अनेक कार्यकर्ते या प्रसंगी उपस्थित होते ।
Maharashtra News Media सच की आवाज