Breaking News

*रात्रीचा विज पुरवठा बंद करुण दिवसा बारा तास देण्याची मागणी* *कार्यकारी अभियंतास शेतकऱ्यांची मागणी*

*रात्रीचा विज पुरवठा बंद करुण दिवसा बारा तास देण्याची मागणी*

*कार्यकारी अभियंतास शेतकऱ्यांची मागणी*

तालुका प्रतिनिधी – रवी काळबांडे
सावनेरः तालुक्यातील शेतकर्यांनी महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीच्या कार्यकारी अभियंता यांना लेखी निवेदन प्रस्तुत करुण सद्यास्थितीत शेतकर्यांना रात्रीच्या वेळीला उपलब्ध होत असलेला विद्युत पुरवठा बंद करुण सकाळपासून तर संध्याकाळ पर्यंत देण्याची मागणी सदर निवेदनातून करण्यात आली आहे.

सावनेर तालुका ग्रामीण काँग्रेसचे अध्यक्ष सतीश लेकुरवाळे यांच्या नेतृत्वाखाली पंचायत समिती सदस्य गोविंदा ठाकरे,मनोज मिरजे,शालिकराम घोरमारे, शंकर मोवाडे आदिंच्या प्रमुख उपस्थितीत म.रा.वि.वि.कंपनी सावनेर चे कार्यकारी अभियंता यांना देण्यात आलेल्या निवेदनातून विनंती करण्यात आली आहे की रात्रीच्या वेळीला विद्युत पुरवठा सुरु असल्याने व शेतीतील पीकांना पाणी देण्याकरिता शेतकर्यांना आपला जिव मुठीत घेउण राऩ डुकरे,रोही,विषारी जिवजंतूंच्या सोबतच सर्पदंश सारख्या जिवघेण्या अवस्थेत सोबतच कडाक्याच्या थंडीत शेतीत पाणी ओलावेक्षलागत आहे त्यामुळे अनेक शेतकरी बांधवांच्या जिवावरही बेतले आहे करीता शेतीतील रात्रीचा विद्युत पुरवठा बंद करुण दिवसा देण्यात यावा अशी विनंतीवजा मागणी निवेदनातून करण्यात आली आहे.सदर निवेदनावर योग्य विचार न झाल्यास अथवा अश्यात एखाद्या शेतकर्यांच्या जिवीतेवर बेतल्यास आंदोलनात्मक भुमिका उभारण्याची तयारी ही याप्रसंगी दर्शविण्यात आली.

याप्रसंगी बाळू कोसरकार, शंकर टोंगे,गौतम पाटील, गजानन मिरचे,मनोहर घोरमारे, काशीनाथ पटे,श्रावण जोगी,योगीराज डांगोरे,गुणवंता काळे,गुड्डू आचार्य, हिरामण क्षिरसागर, मेहर जोगी सह अनेक शेतकरी बांधव उपस्थित होते.

Check Also

*सुनील केदार यांनी मुस्लिम बांधवांना ईदच्या शुभेच्छा दीला*

🔊 Listen to this *सुनील केदार यांनी मुस्लिम बांधवांना ईदच्या शुभेच्छा दीला* मुख्य संपादक – …