*विविध समस्यांमुळे सिहोरावासी त्रस्त*

*कन्हान – पिपरी नगरपरिषद प्रशासनाचे मुख्यधिकारी , नगराध्यक्षा , नगरसेवक , विरोधी पक्ष कुंभकर्णी च्या झोपेत*
कन्हान प्रतिनिधि – ॠषभ बावनकर
कन्हान : – कन्हान-पिपरी नगरपरिषद च्या प्रभाग क्रमांक तीन मधील सिहोरा गावात विविध समस्यांनी नागरिक त्रस्त झाले असुन नगर परिषद प्रशासन , मुख्याधिकारी , अधिकारी , कर्मचारी , सत्ताधारी पक्ष , विपक्ष , कुंभकर्णी च्या झोपेत असल्याने नागरिंकाचे विविध समस्या मिटत नाही आहे.

सिहोरा हे गाव कन्हान नदीच्या काठी बसलेले असुन गेल्या दहा वर्षांपासून पिण्याच्या पाण्याची मोठी समस्या मिटत नाही आहे . सिहोरा गावात सुमारे पाचशे लोक राहतात पण नगर परिषद प्रशासन या गावा कडे लक्ष देत नाही आहे . हे गाव विकासाच्या कामापासून दूर आहे. या सिहोरा गावात सुमारे साठ हजार लिटर टाकी बांधण्यात आली आहे. जे खूपच कमी आहे. या गावात पाण्याची समस्या खुप मोठ्या प्रमाणात असून ही, नगर परिषद प्रशासन, मुख्याधिकारी , सत्ताधारी पक्ष , विरोधी पक्ष या कडे लक्ष न देत असल्यामुळे गावाच्या नागरिकांचे डोके दुखी वाढली आहे .
सिहोरा गावात बसविलेल्या प्रचंड क्षमतेच्या एच टँकच्या तुलनेत जुने बोरींग मशीन कमकुवत असल्याचे सिद्ध झाले आहे. टाकी भरण्यास पंधरा तासांपेक्षा जास्त वेळ लागतो. दुसरीकडे सिहोरा येथील नागरिकांसाठी नगरपरिषद प्रशासनाने सार्वजनिक शौचालय उपलब्ध करुन दिले आहे, परंतु पाण्याची व्यवस्था नसल्याने शौचालयाच्या भोवती झाडे झुडपी वाढलयाने गंदगी साम्राज्य निर्माण झाले असुन शौचालयाची साफ सफाई नियमित पणे केली जात नाही त्यामुळे नाली जाम झाल्याने गावात दुर्गंध पसरत आहे, त्यामुळे लोकांच्या आरोग्यास धोका निर्माण झाला आहे. अशा प्रकारच्या विविध समस्यांमुळे सिहोरा गावातले नागरिक त्रस्त असुन ही कन्हान – पिपरी नगरपरिषद चे मुख्यधिकारी , अधिकारी , कर्मचारी , नगराध्यक्षा , नगरसेवक , विरोधी पक्ष या नागरिकांन कड़े लक्ष केंन्द्रीत करुन लोकांच्या समस्या सोडवत नाहीत आहे .
चुनावाच्या वेळी क्षेत्राचे खासदार , आमदार , व राजकीय पक्षाचे मोठे नेते येऊन नागरिकांना मोठे मोठे आश्वासन देऊन निवडुन येत असलेले उम्मेदवार लोकांच्या पाठीशी उभे राहुन त्यांचा समस्या सोडवत नाही तर कोण सोडवणार हा प्रश्न निर्माण झाल्याने सिहोरा गावातल्या नागरिकांनी जिल्हाधिकारी व नगर परिषद प्रशासनाला निवेदन देऊन लवकरात लवकर विविध समस्या सोडवण्याची मागणी केली .

निवेदन देण्यात मनोज मेश्राम , बंटी डहाटे , उत्तम नाईक , शुभम डहाटे , दीपक बागडे , रवि उके , संजय मोरे , राजेश मेश्राम , जगदीश वारके , पृथ्वीराज बागडे , अर्जुन बावन , मनोज बैतवार , अजय ठाकरे , सुरेंन्द्र गराडे , गणेश लिल्हारे , लीना मेश्राम , सरिता बागडे , सहित मोठ्या संख्येत नागरिक उपस्थित होते .
Maharashtra News Media सच की आवाज