*बेलोना रथ यात्रेवर कोरोना मुळे घालण्यात आली बंधी .*

*बंधीस्त हनुमंताची निघणार नाही रथयात्रा*

*भाविकांना फेसबुक वरती बंधिस्त हनुमान या पेजवर करता येईल लाईव्ह दर्शन*
बेलोना प्रतिनिधी – चंद्रशेखर मस्के
नरखेड – तालुक्यातील बेलोना येथील ग्रामदैवत म्हणून मारोती रायाला सर्व बेलोनावासी मानतात या मारोती रायाच्या रथ यात्रेला माजी मुख्यमंत्री येऊन गेले तर त्यांनी रथावर पुष्प गुच्छाचा वर्षाव हेलिकॉप्टरमधून केला तर काही मंत्री आमदार खासदार नेहमीच येत असतात दूर दुरून तसेच मध्यप्रदेशातून भाविक भक्त मोठ्या संख्येने येत असतात त्यामुळे या यात्रेला मोठे स्वरूप प्राप्त झाले आहे.
ही रथयात्रा पिढ्यान् पिढ्या चालत आलेली आहे .या यात्रेला कोणी बंधीस्त हनुमान म्हणतात तर कोणी बालमुर्ती हनुमान म्हणतात तर कोणी नवसाला पावणारा बजरंग बली म्हणतात ही मूर्ती स्वयःभू जमिनीतून निघालेली असून या बजरंगबलीला फक्त आणि फक्त वर्षा तून ३दिवस भक्तांच्या समोर दर्शनासाठी ठेवल्या जातात या मारोती रायची डिसेंबर महिन्यात मार्गशिष महिन्यात दत्त जयंती च्या पहिल्या दिवशी सकाळी अभिषेक पूजा अर्चना काकडा आरती करून रात्रीला गावातील जनतेच्या दर्शनासाठी प्रभात फेरी काढली जातात या प्रभात फेरीला गावातीलच नव्हे तर संपूर्ण पंचक्रोशीतील भजन मंडळी उपस्थित असतात गावातील बँड पार्ट्या,ढोल ताशा पथक .हनुमान चालीसा मंडळ आदिंसह अनेक झाँकी इत्यादी उपस्थित असतात.तर विद्युत रोषणाईने सजलेले बेलोना व त्यातच सुंदर सजवलेल्या पारंपरिक रथामधून बजरंग बलीची मिरवणूक काढली जातात.

या रथयात्रेत ठिकठिकाणी चहा पाण्याची व्यवस्था गावकरी व सामाजिक संस्था करीत असतात. दुसऱ्या दिवशी म्हणजेच दत्त जयंती च्या दिवशी पौर्णिमेला जीवना नदीच्या काठी विठ्ठल रुक्मिणी मंदिर परिसरात भक्तांच्या दर्शनाकरिता ठेवला जातो या दिवशी भक्तांची दर्शनासाठी खूब गर्दी असतात.
तिसऱ्या दिवशी म्हणजेच पौर्णिमेच्या पाडव्याला रथाला फुलाच्या हारणी सजावट करून रथाची सकाळी मिरवणूक काढली जातात या मिरवणुकीत बाहेर गावातून तसेच मध्यप्रदेशातून भरपूर प्रमाणात दिंड्या, ब्याड,भजन मंडळी देवाचे देखावे आणि लाखोच्या सख्येने भाविक भक्त दर्शनाला येत असतात . सायकाळी रथ पाच वाजता राम मंदिराजवळ आल्यास गोपाल काला म्हणून दही लाहि प्रसाद मिळतो तसेच या यात्रे मधे कुठलाच व्यक्ती उपाशी राहत नाही इथे त्यांना पोहा. ,आलुभात ,चहा,हलवा पुरी निःशुल्क मिळतात तर कुठे जेवण तर कुठे शरबत मिळत असते.
कोरोना मुळे गावकरी जनतेत भ्रम निर्माण झाला होता.यावर्षी यात्रा होणार की नाही आणि रथ निघणार की नाही असा गावकरी जनतेत चर्चा रंगु लागल्या परंतु नुकत्याच झालेल्या बैठकीत उपविभागीय पोलीस अधिकारी काटोल नरखेड तहसीलचे तहसीलदार नरखेड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक जिल्हा परिषद सदस्य मुलताईकर पंचायत समिती सदस्या आरघोडे ग्रामपंचायत सरपंच ,उपसरपंच, तसेच काही पदाधिकारी व गावकरी जनता आणि मंदिराचे ट्रस्टी यांच्या उपस्थितीत पार पडली.
सदर सभेमध्ये कोरोना काळात पंढरपूर ,रामटेक,असे भरपूर उदाहरण देऊन तिथल्या यात्रेवर बंदी घालण्यात आलीहोती.तसेच जिल्हाधिकारी साहेबांचे आदेश आहे तर रथ काढतात येणार नाही तुम्हाला फक्त गावातूनच पाच लोकांची निवड करून पूजा अर्चना करावी लागेल तीपण मास्क लाऊन आणि सोशल डिस्टंसींग ठेऊनच करावे लागेल गावकरी जनतेने जिल्हाधिकारी साहेबांचे आदेशाचे पालन करावे तसेच काळ्या दगडावर कोरून ठेवावे की रथ यात्रा भरणार नाही आणि रथ निघणार नाही त्यासाठी काही कलम सुधा लागू झाले आहेत .तसेच पोलिस तुमच्या गावाला बंधिस्त करेल जेणे करून आजू बाजूच्या आणि दूर दुरून बाहेर गावावरून येणाऱ्यांना गावात येता येणार नाही त्यासाठी कडक बंदोबस्त ठेवला जाईल त्यामुळेभक्त यावर्षी दर्शनाला येणार नाही.
तहसीलदार यांनी या यावर चर्चा करून गावातील यात्रे बदल तसेच कोरोणाची माहिती देऊन आपल्याला रथ गावामधे फिरवता येणार नाही गावकरी जनतेला दर्शन घेण्यासाठी सोशल डिष्टन आणि मास लाऊन दर्शन घेता येईल यावर्षी तुम्हाला तुमच्या गावात रथ यात्रा साजरी करता येणार नाही त्यासाठी गावकरी जनतेने स्वतः आपल्या नातेवाईकांना फोन करून सांगावे की यावर्षी तुम्ही यात्रेला येऊ नका तुम्ही नंतर कधीतरी दर्शनाला येऊ शकता .तसेच ट्रस्टचे पुजारी यांनी गावकरी जनतेला तुम्ही तुमच्याच घरी म्हणजेच प्रत्येक व्यक्तीने आप-आपल्या घरी सायंकळी पाच वाजता गोपाल काला प्रसाद म्हणून वाटावा.अशी विनंती केली आहे.
एकीकडे शासनाचे नियम आणि पोलिस कलम आहे तर दुसरीकडे चालत आलेली रुढी पर्था परंपरा मोडल्या जात आहे . तरीपण गावकरी जनतेनचे शासनाकडे तहसीलदार आणि ट्रस्ट्ट यांनी पाठवलेल्या प्रस्तावावर काही निर्णय निघू शकतो का तसेच रथ फिरवण्यास परवानगी भेटू शकते का याकडे लक्ष लागले आहेत.
Maharashtra News Media सच की आवाज