*मोवाड रेल्वे स्थानकाचे बेहाल*

*मध्य रेल्वे चे दुर्लक्ष*
नरखेड प्रतिनिधी- श्रीकांत मालधुरे
नरखेड – अमरावती रेल्वे रूळ सन २०१४ मध्ये सुरू झाली. दररोज या मार्गाने रेल्वेने शेकडो प्रवासी प्रवास करतात . तर प्रत्येक गुरुवार ला प्रवास्यांची संख्या मोठ्या प्रमाणात असते. मोवाड सह खैरगाव , थुंगाव , मदना , जलालखेडा , भारसिंगी , सह अनेक गावातील प्रवासी मोवाड स्थनकावर येतात . मोवाड येथून थेट संत नगरी शेगाव जायची सोय आहे. पण मात्र रेल्वे स्थानकावर परमनंट तिकीट कॉउंटर नसल्याने प्रवास्यांना विना तिकीट प्रवास करावा लागत आहे. तर दररोज पहाटे जाणारी काचिकुडा एक्सप्रेस च्या वेळी रेल्वे स्थानकावरचे लाईट बंद असते. त्यामुळे प्रवास्यांना आंधाराचा सामना करावा लागत आहे. रेल्वे स्थानकावर पिण्याच्या पाण्याची सुध्दा सोय नाही . त्यामुळे बाहेरील प्रवास्यांना पाण्यासाठी तळमळ करावी लागते. रेल्वे चे सिंग्नल नसल्यामुळे २ मिनिट थांबा असलेल्या रेल्वे गाड्या फक्त काही सेकंदच थांबतात त्यामुळे चढ आणी उतार करणाऱ्या प्रवासांना जिवाशी खेळावे लागते. अनेकदा मोवाड रेल्वे स्थानकावर चढ उतार करते वेळी प्रवास्यांचा जिव गेला आहे.

मोवाड रेल्वे स्थानकावर जंगलाचे स्वरूप तयार झाले आहे. तर मोवाड – जलालखेडा रस्त्यावरून रेल्वे स्थानकावर जाणाऱ्या रस्तावर पूर्णतः जगलाचे स्वरूप तयार आहे. त्यामुळे नागरिकांना रेल्वे स्थानकावर जा – या साठी त्रास सहन करावे लागते . पावसाळ्यात रेल्वे स्थानकावर जाणाऱ्या रस्त्याच्या दोन्ही बाजुला नाली नसल्याने पाण्याचे तळ साचुन असते . त्यामुळे नागरिकांना सरपटणाऱ्यांना प्राण्यांची भिती चा सामना करावा लागते. यावर मध्य रेल्वे प्रशासनाचे लक्ष नाही.

*प्रतिक्रिया*
अनेकदा खासदार कृपालजी तुमाने यांच्या माध्यमातुन मध्ये रेल्वेचे डि.आर.एम यांना वारंवार पत्र दिले पण अजुन पर्यत यावर मध्य रेल्वेने कार्यवाही केली नाही . यात रेल्वे प्रशासनाचे दुर्लक्ष दिसून येत आहे.
हिराचंद कडू
शिवसेना शहर प्रमुख मोवाड
स्थानिक लोकप्रतिनिधीच्या
दुर्लक्षशामुळे रेल्वे स्थानकाच्या समस्या प्रलंबित आहे. खासदार कृपालजी तुमाने यांनी यावर लक्ष द्यावे . व त्वरीत समस्या सोडवाव्या जेणे करून प्रवास्याची गैर सोय होणार नाही.
रवि माळोदे
अध्यक्ष भाजपा मोवाड तसेच आमरावती ते नागपूर मार्ग साठी नवीन रेल्वे सुरू करावीत अशी मोवाडवासी जनतेची मागणी आहेत.
Maharashtra News Media सच की आवाज