Breaking News

*आपले शहर आपली जबाबदारीची भावना ही प्रत्येकाने अवलंबिली तर शहर कचरामुक्त होण्यास मदत होणार – मुख्याधिकारी अर्चना वंजारी* *सातारा-सांगलीच्या मुलामुलींचे पथनाट्याद्वारे जनजागृती*

*आपले शहर आपली जबाबदारीची भावना ही प्रत्येकाने अवलंबिली तर शहर कचरामुक्त होण्यास मदत होणार – मुख्याधिकारी अर्चना वंजारी*

*सातारा-सांगलीच्या मुलामुलींचे पथनाट्याद्वारे जनजागृती*

पारशिवनी तालुका प्रातिनिधी – कमलसिंह यादव

पारशिवनी- संपूर्ण विदर्भात पहिल्यांदाच नगरपंचायत पारशिवनी येथे स्वच्छ सर्वेक्षण अभियान 2021 व “माझी वसुंधरा अभियाना” , बाबत वासुदेव फेरी, पथनाट्य इत्यादी अभिनव कार्यक्रमाद्वारे मोठ्या प्रमाणात जनजागृती करण्यात येत आहे सुंदर तसेच कचरामुक्त शहर करण्यासाठी पारशिवनी नगर पंचायतर ची मुख्यआधिकारी अर्चना वंजारी कटीवंध आहे,तसेच नगर पंचायत कार्यालयाने शहरातील नागरिकांना शहर कचरा मुक्त करण्याचे आवाहन करीत सातारा-सांगली येथील विद्यार्थ्यांनी पथनाट्य सादर करून शहरात जनजागृती केली.


जनजागृती करीत असताना पारशिवनी शहरात कचरा होणार नाही याची काळजी घेतली पाहीजे तसेच इतरत्र कचरा होणार नाही, ही शहरातील प्रत्येक नागरिकांच जबाबदारी आहे हे सांगली सातारा येथील पथनाट्य पथकातील मुलामुलींनी नाटीका सादर करून जनजागृती केली. तर शहर स्वच्छ सुंदर ठेवण्याची जबाबदारी ही प्रशासन तसेच प्रत्येक नागरिकांची आहे, हे या पथनाट्याच्या माध्यमातून सादरीकरण करून जनजागृती केली जात आहे. आपले शहर आपली जबाबदारीची भावना ही प्रत्येकाने अवलंबिली तर शहर कचरामुक्त होण्यास मदत होणार असून, स्वच्छ भारत अभियान यशस्वीपणे राबवले जाऊ शकते. असे आव्हान नगर पचां ची मुख्य अधिकारी अर्चना वंजारी यंती शहरातील् नागरिकाना केले आहे, पथनाट्य पारशिवनी शहरातील अनेक प्रभागात तसेच शहरातील मुख्य ठिकाणी सादर करून जनजागृती केली. या पथनाट्याच्या सादरीकरणावेळी नगरपंचायत मुख्याधिकारी अर्चना वंजारी, पो. नि.संतोष वैरागडे, उपाध्यक्ष माधुरी भिमटे,सागर सायरे सभापती, सभापती गुलनाज शेख, सभापती निकीता गौनाडे, नगरसेवक ओम पालीवाल, व इतर नगरसेवक-नगरसेविका तसेच कार्यालयीन कर्मचारी, नगरवासी उपस्थित होते.

Check Also

*नन्ही रोजेदार – कु.जामिया जमिर शेख*

🔊 Listen to this *नन्ही रोजेदार* सावनेर ः पवित्र रमजान के अवसरपर शहरकी पाच वर्षीय …