*आदिवासी माना जमात विद्यार्थी युवा संघटना ग्राम शाखा बोरडा कडून नागदिवाळी महोत्सव अति उत्साहात साजरा*

रामटेक प्रतिनिधि – पंकज चौधरी
बोरडा –आदिवासी समाजातील 18 व्या क्रमांकावर नमूद असलेली माना जमात मुख्यतः आदिवासी आहे ही बाब कुणीही नाकारू शकत नाही.आदिवासी म्हणजे आधीपासून वास करणारे .यामध्ये त्यांच्या विशिष्ट चालीरीती,परंपरा आणि संस्कृती जपून ठेवणे हे प्रत्येक आदिवासींचे काम आहे..माना समाजाचा खूप मोठा इतिहास आपल्याला पहावयास मिळते.नागवंशीय माना जमातीचे वैरागड आणि माणिकगड येथे राज्य होते.चंद्रपूर,गडचिरोली या जिल्ह्यात प्रामुख्याने माना समाजाचं अस्तित्व दिसून येते.माना समाज अतिशय पराक्रमी आणि सामर्थ्यवान व्यक्तिमत्व होते.त्यामध्ये समाजासाठी वीरांगना मुग्धाई यांचे खुप मोलाचे योगदान आहे. समाजाकरिता त्यांनी स्वतःच्या जीवाची देखील कुर्बानी दिली होती.
नागदिवाळी हा सण माना जमातीतील सर्वात महत्वाचा आणि प्रमुख सण मानला जातो.मार्गशीर्ष शुद्ध पंचमीला वीरांगना मुग्धाई यांचा जन्म झाला होता.व सर्व माना समाज बांधव हे नागवंशीय असल्याने या मार्गशीर्ष महिन्यात नागदिवाळी हा सण साजरा केला जातो.सर्व आदिवासी माना बांधव अगोदर वैयक्तिक रित्या स्वतःच्या घरी पूजा करून कार्यक्रम पार पाडत होते.पण नंतर 2005 पासून सार्वत्रिक पद्धतीने कार्यक्रम करू लागलेत.
सर्वात अगोदर नागदिवाळी सण हा चिमूर तालुक्यातील डोमा या गावी साजरी करीत असून त्यानंतर गावोगावी साजरी केली जाते.म्हणून आदिवासी माना जमात विद्यार्थी युवा संघटना ग्राम शाखा बोरडा कडून दि.26 डिसेंबर 2020 ला नागदिवाळी सण साजरा झाला.त्यात संघटनेतर्फे गावाची सम्पूर्ण साफ-सफाई करून,मिरवणूक काढून,रांगोळी स्पर्धा घेऊन ,डहाका गीत गायन,मान्यवरांचे मार्गदर्शन असे नियोजित कार्य करून कार्यक्रम पार पडले..संपूर्ण विदर्भात आम्ही जनजागृती चे कार्य करीत आहोत.व रामटेक तालुक्यातील खोडगाव,माहुली,घुकसी, गुंडरी,सराखा व बोरडा ई. गावी नागदिवाळी चा कार्यक्रम केले जाते.असे संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले.
Maharashtra News Media सच की आवाज