Breaking News

*कन्हान येथे दुचाकी चोरीच्या प्रमाणात वाढ* *पाच दुचाकी गेले चोरीला , फक्त दोन दुचाकी चे चोर मिळाले असुन तीन दुचाकी चोर पकडण्यात कन्हान पोलीस अपयश*

*कन्हान येथे दुचाकी चोरीच्या प्रमाणात वाढ*

*पाच दुचाकी गेले चोरीला , फक्त दोन दुचाकी चे चोर मिळाले असुन तीन दुचाकी चोर पकडण्यात कन्हान पोलीस अपयश*

कन्हान प्रतिनिधि – ॠषभ बावनकर

कन्हान – कन्हान पोलीस स्टेशन अंतर्गत आतापर्यंत पाच दुचाकी चोरी करण्यात आल्या असुन यातील दोन दुचाकी च्या चोरास गुन्हे अपराध शाखा नागपुर व कन्हान पोलीसांनी पकडले असुन अद्याप तीन दुचाकी च्या चोरास पकडण्यास कन्हान पोलीसांना यश आले नसल्याने कन्हान परिसरात चोरी च्या घटना वाढुन दुचाकी चोरीचे व इतर चोरी च्या प्रमाणात वाढ झाली आहे .
शुक्रवार दिनांक १५ जानेवारी ला तुकाराम नगर कन्हान येथे प्रभाकर वांदिले यांच्या राहते घरून भर दिवसा एँक्टीव्हा एम.एच ४० व्ही १०२४ दुचाकी अज्ञात चोरांनी चोरून नेली असता तिचा शोध घेऊन मिळुन न आल्याने कन्हान पोलीस स्टेशन ला फिर्यादी अमोल प्रभाकर वांदिले तुकाराम नगर कन्हान हयांनी तक्रार दिल्याने कन्हान पोलीसांनी दिनांक १८ ला कलम ३७९ भा.दं.वि नुसार गुन्हा दाखल करून हेड कॉन्स्टेबल नरेश वरखडे पुढील तपास करित आहे.
या अगोदर कन्हान पोलीस स्टेशन अंतर्गत

१) अशोकसिंग ठाकुर यांची एम.एच ४० ए.जी ९६६६ दुचाकी वाहन सप्टेंबर २०२० मध्ये २) चेतन विनायक हिवसे अँक्टीव्हा एम.एच ४० ए.एच ३९५५ (दिनांक .२२ /९/२०२०) ला ३़) कामठीची महिला राख विसर्जना करिता आली असता बीकेसीपी शाळेच्या जवळुन स्टॉंड वरून दिनांक ४ जानेवारी ला एम.एच ४० ए.डी १३११ अँक्टीव्हा दुचाकी चोरी गेली.
४) रामबच्चन रामकिशन प्रसाद ४८ राहणार शिवनगर कांद्री पॅशन प्रो.दुचाकी निळा कलर एम.एच ४० ए.एफ ८८८७ दिनांक. ९/०१/२०२१ ला भाटिया कोल वॉसरीज गोंडेगाव डुमरी रोड येथुन चोरी गेली .
५) अमोल प्रभाकर वांदिले यांची एँक्टीव्हा एम एच ४० व्ही १०२४ दुचाकी दिनांक १५ ला अज्ञात चोरानी चोरून नेली.

यातील १) अशोकसिंग ठाकुर यांची एम एच ४० ए जी ९६६६ दुचाकी व २) एमएच ४० एजी ९६६६ तिरोडा येथुन गुन्हे अपराध शाखा नागपुर व कन्हान पोलीसांनी आरोपी १) छोटेलाल ताराचंद कनोजे राहणार बिरसी तालुका तिरोडा, आरोपी २) सागर चव्हाण राहणार नागपुर यांना पकडुन दोन दुचाकीचा शोध लावला. तर पाच दुचाकी चोरीतील फक्त दोन दुचाकी मिळाल्या परंतु तीन दुचाकी चोरास पकडण्यास कन्हान पोलीसांना यश आले नसल्याने दुचाकी व इतर चोरीच्या प्रमाणात वाढ झाली आहे . त्यामुळे नागरिकांन मध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाल्याने रात्री – दिवसा पोलीस ग्रश्त वाढविण्यात यावे अशी मागणी आता जोर धरु लागली आहे .

Check Also

*सावनेर शेगाव बस सुरु* *नगराध्यक्षा संजना मंगळे यांनी दाखवली हिरवी झंडी*

🔊 Listen to this *सावनेर शेगाव बस सुरु* *नगराध्यक्षा संजना मंगळे यांनी दाखवली हिरवी झंडी* …