Breaking News

*’गुमथी’ मध्ये रेबीज लसीचा तुटवडा*

*’गुमथी’ मध्ये रेबीज लसीचा तुटवडा*

 

नागपुर उपजिल्हा प्रतिनिधी दिलीप येवले

कोराडी:- भटक्या तसेच पाळीव कुत्र्यांचा वाढता उपद्रव पाहता ती चावल्यानंतर रेबीज इंजेक्शन साठी येणाऱ्या रुग्णांच्या संख्येत वाढ झाली आहे. दररोज दहा ते पंधरा जणांवर उपचार होतात.
रस्तावरील कुत्रा चावल्यास 5-7 अधिक इंजेक्शन दिली जातात. 3 र्‍या इंजेक्शननंतर पुढील इंजेक्शन्स आठवड्याभराच्या फरकाने दिली जातात. यामुळे इंफेक्शनचा धोका कमी होतो तसेच रोगप्रतिकारशक्ती वाढवली जाते. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार, रेबीजला रोखण्यासाठी इंजेक्शन आणि इम्युनोग्लोबुलिन हे अधिक योग्य उपचार आहेत.रेबिज हे व्हायरल इंफेक्शन आहे. त्यावर केवळ अ‍ॅन्टी बॅक्टेरियल लोशन लावून फायद्याचे नाही. अ‍ॅन्टीसेप्टीकमुळे इंफेक्शन अधिक वाढू नये म्हणून काळजी घेतली जाऊ शकते. परंतू शक्य तितक्या लवकर डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे. कारण उपचाराभावी काही वेळेस कुत्रा चावणे हे जीवघेणेही ठरू शकते. त्यामुळे त्याची तीव्रता आणि धोका ओळखण्यासाठी वैद्यकीय मदत गरजेची आहे.
आरोग्य विभाग, जिल्हा परिषद, नागपूर मधील ‘रेबीज’ औषधांच्या तुटवड्यामुळे आरोग्य वर्धिनी केंद्र गुमथी येथे उपचार न करता पुढे पाटणसावंगी आरोग्य केंद्रात रुग्णांना पाठविण्याचे प्रमाण सातत्याने चालू असल्याचे निरीक्षण राष्ट्रवादी काँग्रेस (ग्रा.) चे जिल्हा उपाध्यक्ष भुषण चंद्रशेखर यांनी नोंदविले.

Check Also

*उपाध्यक्ष बने राजु घुगल* *डॉ. विजय धोटे व मंदार मंगळे स्विकु्त नगरसेवक* *नगराध्यक्षा व नगरउपाध्यक्ष ने बनाया इतिहास*

🔊 Listen to this *उपाध्यक्ष बने राजु घुगल* *डॉ. विजय धोटे व मंदार मंगळे स्विकु्त …