Breaking News

*मराठी भाषेचे संवर्धन करणेही मराठी माणसाची जबाबदारी-डाॅ.शरयू तायवाडे*

*मराठी भाषेचे संवर्धन करणेही मराठी माणसाची जबाबदारी-डाॅ.शरयू तायवाडे*

 

नागपुर उपजिल्हा प्रतिनिधी दिलीप येवले
काेराडी – येथील तायवाडे महाविद्यालयातील मराठी विभागाच्या ज्ञान संवाद मंडळाच्या वतीने “मराठी भाषा पंधरवडा” निमित्ताने ” मराठी भाषेपुढील आव्हाने” या विषयावर आभासी पध्दतीने व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले. यावेळी प्रमुख वक्ते प्रभाकरराव मामुलकर कला महाविद्यालय काेरपना येथील मराठी विभाग प्रमुख डॉ सुदर्शन दिवसे हाेते. त्यांनी जागतिकीकरणाच्या काळात मराठी भाषा जतन करणे गरजेचे असल्याचे सांगून प्रमाण भाषे इतकेच महत्त्व बाेली भाषेला देखील असल्याने मराठी ची व्यापकता वाढविण्यासाठी बाेलींचे जतन केले पाहिजे असे सांगितले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी असणाऱ्या प्राचार्य डॉ शरयू तायवाडे यांनी मराठी भाषा ही देशविदेशात आज पाेहचली आहे. त्यावरून तिची समृद्धी लक्षात येते. त्यामुळे राज्यात तिला ज्ञानभाषेचा दर्जा दिला पाहिजे व यासाठी मराठी
भाषेचे संवर्धन करणेही मराठी मानसाची जबाबदारी आहे
शिवाय सर्व क्षेत्रात मराठी भाषा सक्तीची हाेणे गरजेचे असल्याचे सांगितले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. राजेंद्र वाटाणे यांनी केले. सूत्र संचालन डॉ काेमल ठाकरे यांनी केले. यावेळी महाविद्यालयातील प्राध्यापक आणि विद्यार्थी माेठया संख्येने कार्यक्रमात सहभागी झाले होते.

Check Also

*सुनील केदार यांनी मुस्लिम बांधवांना ईदच्या शुभेच्छा दीला*

🔊 Listen to this *सुनील केदार यांनी मुस्लिम बांधवांना ईदच्या शुभेच्छा दीला* मुख्य संपादक – …