*आज जगातील सर्वश्रेष्ठ महामानव महात्मा गांधी- डॉ . कोमल ठाकरे*
नागपुर उपजिल्हा प्रतिनिधी – दिलीप येवले
नागपुर:- कोराडी येथील तायवाडे महाविद्यालयात जयंती पुण्यतिथी समितीच्या वतीने महात्मा गांधी यांच्या पुण्यतिथी समारंभाचे आयोजन करण्यात आले होते . यावेळी महामानव महात्मा गांधी यांच्या व्यक्तिमत्व विकासाची कार्यकर्तुत्वाची वैशिष्ट्ये समजावून सांगताना प्रा . डॉ . कोमल ठाकरे यांनी महात्मा गांधी हे महामानव कसे होते . त्यांचे महामानवत्व जगातील लोकांनी कसे मान्य केले होते . याबद्दल विस्तृत विवेचन केले . सत्य अहिंसा,अस्तेय,अपरिग्रह ,
ब्रह्मचर्य या तत्वावर त्यांच्या कार्याचे मंदिर उभे होते . ते मनुष्य धर्माचे पुरस्कर्ते होते . त्यांना कोणत्याही धर्माच्या चोकटीत बंदिस्थ करता येत नाही . त्यांनी सर्वधर्मातील मुल्याना स्वीकारले होते . त्यांचे जीवन हाच एक संदेश होता . राजकारणातील सूत्रे हातात घेतल्यानंतर राष्ट्राचे नेतृत्व करण्याची प्रचंड क्षमता त्यांच्यात होती . त्यांनी देशातील सर्व लोकांना संविधानमूल्य संस्कृती रुजविण्यासाठी प्रयत्न केले . त्यांनी मूल्ययोगी शिक्षणपद्धतीचा स्वीकार केला होता.स्वावलंबन शिकविणारे जीवनशिक्षण त्यांना महत्वाचे वाटले . ज्यामुळे मानवाचा आत्मा स्वतंत्र होतो अशा शिक्षण पद्धतीतून व्यक्तीचा भावनिक , बौद्धिक , आणि कौशल्यविकास व्हावा यावर त्यांचा विशेष भर होता . राजकारणात नैतिकता असावी , श्रमाविना संपत्ती नको यावर त्यांचा कटाक्ष होता . व्यापारातही नीतिमत्ता असावी असे त्यांनी म्हटले या सर्व बाबतीतून गांधीजींचे व्यक्तिमत्व हे व्यापक ,विशाल, चरित्रसंपन्न नीतिवान, गुणवान होते त्यांची उंची आकाशाला भिडली होती यासर्व बाबींवर डॉ.कोमल ठाकरे यांनी प्रकाश टाकला . या कार्यक्रमाप्रसंगी महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ.शरयू तायवाडे अधयक्षस्थानी होत्या . जयंती पुण्यतिथी समितीचे समन्वयक डॉ .अभिविकास नखाते यांनी समारोपीय आभार मानले डॉ . रवींद्र बाहेकार यांनी सूत्रचालन केले .या कार्यक्रमाला महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी या कार्यक्रमाला उपस्थित होते.
Maharashtra News Media सच की आवाज