*राष्ट्रवादी परिवार संवाद यात्रा वर्धा जिल्ह्यात*
वर्धा प्रतिनिधि – पंकज रोकड़े
वर्धा – राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष गेल्या ८ दिवसापासून राष्ट्रवादी परिवार संवाद यात्रा संपूर्ण विदर्भ भर फिरत असून काल राष्ट्रवादी परिवार संवाद यात्रा राज्याचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रांत अध्यक्ष तथा जलसंपदा खात्याचे मंत्री मा.ना.श्री जयंत दादा पाटील साहेब यांचा वर्धा जिल्हा दौरा दिनांक ०३/०२/२०२१ रोजी आर्वी विधानसभा क्षेत्रात होता त्यानिमित्ताने सर्व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते अतिशय उत्साहाने कामाला लागले व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा सर्व कार्यकर्त्यांनी तन-मन-धन अर्पण करून आर्वी विधानसभा क्षेत्राचे सर्व प्रलंबित प्रश्न राज्य शासनाच्या लक्षात आणून दिले व राज्याचे मंत्री म्हणून मा. ना. जयंत दादा पाटील साहेबांनी त्या सर्व प्रश्नाला उजाळा देण्याच्या दृष्टीने शासन स्तरावर भूमिका साहेबांने त्या सर्व प्रश्नाला उजाळा देण्याच्या दृष्टीने शासनस्तरावर ग्वाही दिली.आणि वर्धा जिल्हा मध्ये ४४- आर्वी विधानसभा मतदारसंघ कसा राजकीय पक्षिय संघटन बळकर करता येईल कार्यकर्ता कसा मजबूत करता येईल त्यासाठी राज्यशासनाचे सर्वत्र प्रयत्न असेल. अशी ठाम निर्णयात्मत भूमिका साहेबानी आपल्या भाषणात मांडणी केली.

या कार्यक्रमाचे अध्यक्ष वर्धा जिल्हा अध्यक्ष सुनील राऊत साहेब यांच्या अध्यक्षतेखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रांताध्यक्ष व राज्याचे जलसंपदा खात्याचे मंत्री मा. ना. जयंत पाटील साहेब, महाराष्ट्र प्रदेश महिला काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षा मा. रूपालीताई चाकणकर, महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अध्यक्ष मा.मेहबूब शेख, राष्ट्रवादी काँग्रेसच्या युवती अध्यक्षा कुमारी मा.सक्षणा सलगर प्रदेशाध्यक्ष रविकांत संभाजी वरपे प्रदेश कार्याध्यक्ष महाराष्ट्र प्रदेश युवक,राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस संजय खोडके जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्व मान्यवर मंडळी या कार्यक्रमाला उपस्थित होते आर्वी शहर अध्यक्ष रत्नदीप मोटघरे,विद्यार्थी विधानसभा अध्यक्ष विश्वास बांगरे, राष्ट्रवादी पदवीधर मतदार संघाचे प्रमुख आर्वी तालुका चव्हाण आर्वी विधानसभा मतदारसंघाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्यासंख्येने उपस्थित होते.
Maharashtra News Media सच की आवाज