*आत्मनिर्भर भारत योजनेत उत्कृष्ट कार्य करणाऱ्या घरपोच च्या संवादकाचा सत्कार*

नरखेड तालुका – प्रतिनिधि श्रीकांत मालधुरे
नरखेड – गेले अनेक दिवसापासून भारतात व विदेशात कोरोना या महामारीने अनेक व्यवसाय हे ठप्प करून टाकलेत व यामुळे मोठ्या प्रमाणात बेरोजगारीची समस्या व भारतातच्या दरडोई उत्पन्न मोठ्या प्रमाणात घट झालीत .यांच्या परिणाम भारत देशाची व महाराष्ट्रची अर्थव्यवस्था ही अनेक आर्थिक संकटात सापडलीत या साठी भारतीय ग्रामीण अर्थव्यवस्था मजबूत करणे साठी आत्मनिर्भर भारत योजने अंतर्गत घरपोच कनेकट ही स्वदेशी मोबाईल ऍप्स या तयार करून भारतीय ग्रामीण भागातील लहान उद्योगांना मोठ्या प्रमाणात या अँप च्या मधून बाजारपेठ निर्माण करून दिलीत व यामुळे अनेक महिलाना व तरुणना रोजगार उपलब्ध झालात.अशाच नरखेड व काटोल मधील दोन तरुणांनी घरपोच संवादक विक्रम सरोदे मु.रिधोरा ता काटोल व श्रीकांत मालधुरे मु.मोवाड ता नरखेड यानी भारत.देशाची स्वदेशीची व आत्मनिर्भर भारत अंतर्गत १ जानेवारी ते २६ जानेवारी या कालावधी
मी स्वदेशीचा -मी घरपोच चा तिरंगा अभियान या अभियाम मध्ये उत्कृष्ट कार्य करुन मा.काटोल ग्रामीणचे पोलीस उपविभागीय अधीकारी मा नागेश जाधव यांच्या हस्ते शाल व पुष्पगुच्छ देऊन काटोल येथील उपविभागीय पोलीस अधिकारी काटोल कार्यलयात सत्कार करणे आला यावेळी प्रमुख उपस्थिती म्हणून अनूलोमचे पूर्व विदर्भ प्रमुख मा . हेमंत ब्राम्हणकर व रामटेक उपविभाग प्रमुख मा . सुनील फाटे,व नरखेड,काटोलचे भागजनसेवक सुनील धांडे याची उपस्थित होती.
Maharashtra News Media सच की आवाज