Breaking News

*काम त्वरित सुरू करा अन्यथा विधानसभा सभागृहाच्या पायरीवर आमरण उपोषण – आमदार दादाराव केचे* *६ मार्च पर्यंत काम सुरू न झाल्यास आक्रमक पवित्रा घेणार*

*काम त्वरित सुरू करा अन्यथा विधानसभा सभागृहाच्या पायरीवर आमरण उपोषण – आमदार दादाराव केचे*

 

*६ मार्च पर्यंत काम सुरू न झाल्यास आक्रमक पवित्रा घेणार*

आर्वी – तालुक्यातील आर्वी ते देऊरवाडा यारस्ताचा शुभारंभ वर्धा लोकसभा क्षेत्राचे खासदार रामदास तडस आणि आर्वीचे विधानसभाचे भरघोस मतांनी निवडून आलेले आमदार दादाराव केचे यांनी केला होता. भारतीय जनता पक्षाच्या सरकारच्या काळात हा रस्ता प्राकलन किंमत ६०.३६ कोटी रुपये मंजूर करण्यात आले होते.

परंतु महाविकास आघाडीच्या सरकारने विकास कामात रोडा टाकून हे काम ठप्प पाडले. या रस्त्याची दैननिय अवस्था पाहता आर्वीकर तथा ग्रामीण भागातील जनता यांच्यात चांगलाच रोश उत्तम झाला आहे. त्यामुळे आमदार दादाराव केचे यांनी १ मार्च रोजी विधानसभेत सुरू होणाऱ्या अधिवेशनात दिनांक ८ मार्च रोजी विधानसभेच्या सभागृहाच्या पायरीवर आमरण उपोषण करण्याचा इशारा दिलेला आहे.

या रस्त्याचे भुमिपुजन खासदार रामदास तडस यांनी आमदार दादाराव केचे यांच्या अध्यक्षतेखाली केले होते. परंतु त्यानंतर सत्येचा दुरूपयोग घेत वर्धा जिल्हाचे पालकमंत्री तथा माजी आमदार यांनी पुन्हा एकदा भुमिपुजन सोहळा आयोजित केला होता. या प्रकरणी काही खेळ अर्थ क्षात्राचा नाही ना यावर आर्वी शहर तथा ग्रामीण भागातील जनतेत खमंग चर्चा रंगली आहे.

Check Also

*उपाध्यक्ष बने राजु घुगल* *डॉ. विजय धोटे व मंदार मंगळे स्विकु्त नगरसेवक* *नगराध्यक्षा व नगरउपाध्यक्ष ने बनाया इतिहास*

🔊 Listen to this *उपाध्यक्ष बने राजु घुगल* *डॉ. विजय धोटे व मंदार मंगळे स्विकु्त …