*नागपूर जिल्ह्याची जिवनदायिनी वीज केंद्रासह कोळसा खाणीमूळे प्रदूषित*
*विषारी धूर व सांडपाण्यामूळे कन्हान नदीच पावित्र्य घोक्यात*

*उपाययोजना करा अन्यथा जल जन आंदोलन -माजी खासदार प्रकाश जाधव*
कन्हान प्रतिनिधि – ॠषभ बावनकर
खापरखेड़ा – नागपूर जिल्ह्याची जिवनदाहिनी असलेल्या कन्हान नदीच्या पत्रात मागील अनेक वर्षांपासून वीज केंद्रासह, कोळसा खाणी मूळे प्रदूषित झाली असून विषारी धूर व सांडपाण्यामूळे जीवनदायिनीचे पावित्र्य धोक्यात आले आहे वेळीच उपाययोजना करा अन्यथा जलजन आंदोलन करण्याचा ईशारा ग्रामोन्नती प्रतिष्ठांणचे संस्थापक व माजी खासदार प्रकाश जाधव यांनी दिला आहे . “कन्हान – पिपरी ग्रामोन्नती प्रतिष्ठाणा चे संस्थापक अध्यक्ष व रामटेक लोकसभा माजी खासदार प्रकाश जाधव हे कन्हान नदी बचाओ” या कार्यक्रमा अंतर्गत खापरखेडा येथे जनजागृती करण्यासाठी २ मार्च बुधवारला आले असतांना बोलत होते .
कन्हान नदीच्या पात्रात राख मिश्रित पाणी, विषारी धूळ, सांडपाणी सोडल्या जात असल्यामूळे नागपूर जिल्ह्याची जिवनदाहिनी कन्हान नदी प्रदूषणाच्या विळख्यात सापडली असून ती शेवटची घटका मोजत आहे.
नद्या ह्या नैसर्गिक पाण्याचे स्रोत आहेत त्यामूळे पिण्याच्या पाण्याच्या गुणवत्ता असलेल्या २० नद्या महाराष्ट्र शासनाने १५ जुलै २००० व १३ जुलै २००९ रोजी जाहीर केल्या आहेत त्यांना अ,ब,क,ड गट देण्यात आले आहेत ठरवून दिलेल्या गटानुसार नद्यांच्या उच्चतम पुर रेषेपासून कारखाने, कोळसा खाणी, उद्योग धंदे किती अंतरावर लावण्यात यावे हे निश्चित करण्यात आले असून ग्रीन, ऑरेंज, रेड झोन तयार करण्यात आले आहे खापरखेडा वीज केंद्र व कोळसा खाणी ह्या रेड झोन मध्ये येतात त्यामूळे ते नदीपासून कमीत कमी दोन किमी अंतरावर असने आवश्यक आहे मात्र ५०० मेगावॅट वीज केंद्र प्रकल्पाची परवानगी घेतांना संबंधित विभागाची दिशाभूल करून कन्हान नदी पासून वीज केंद्राचे अंतर दिड किमी असल्याचे कागदोपत्री दाखवण्यात आल्याचा आरोप माजी खासदार प्रकाश जाधव यांनी केला शिवाय वीज प्रकल्प पूर्णत्वास आल्यानंतर सदर वीज केंद्राचे अंतर नदी पासून शून्य किमी कागदोपत्री दाखविण्यात आले त्यामूळे वीज निर्मिती करण्याची परवानगी दिली कुणी? असा प्रश्न जाधव यांनी उपस्थित केला पिण्याच्या पाण्याच्या गुणवत्ता असलेल्या २० नद्या महाराष्ट्र शासनाने जाहीर केल्यामूळे सर्व सामान्य नागरिकांच्या जिवणाला सुरक्षित ठेवणे वीज केंद्रासह कोळसा खाणी प्रशासनाचे प्रथम कर्तव्य आहे शिवाय हवा, पाणी, जमिन आदि मधून प्रदूषण निर्माण होणार नाही याची काळजी घेणे त्यांची नैतिक जबाबदारी आहे मात्र कन्हान नदीत विषारी धूर, राखमिश्रित पाणी, सांडपाणी आदि सोडल्या जात आहे हवा व पाण्यात विष कालवने हा कायद्याने गंभीर गुन्हा आहे नद्यांचे पावित्र्य धोक्यात येत आहे नको ते रोग व्हायला लागले आहेत त्यामूळे हरित लवादाने (नॅशनल ग्रीन ट्रिब्युनल) व महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने गाईड लाईन दिल्या आहेत मात्र उल्लंघन करण्यात येत आहे याची सखोल चौकाशी करण्यात यावी व दोषींवर कायदेशीर कार्यवाहीची मागणी प्रकाश जाधव यांनी केली आहे.
*बाक्स पर्यावरण सुरक्षित ठेवण्यासाठी ग्रीन बेल्ट आवश्यक*
पर्यावरणा वर नियंत्रण मिळविण्यासाठी नदी, वीज केंद्र व गाव यात ग्रीन बेल्ट तयार करने आवश्यक आहे मात्र खापरखेडा ५ किमी परिसरात कुठेही ग्रीन बेल्ट दिसून आला नाही त्यामूळे जलसंरक्षण कायदा १९७४, पर्यावरण कायदा १९८६, हवा संरक्षण कायदा १९८१ व १९८६ कायदा खापरखेडा औष्णिक वीज केंद्र प्रशासनाने भंग केला आहे त्यामूळे त्यांच्यावर कार्यवाही अपेक्षित असल्याचे प्रकाश जाधव यांनी सांगितले.
*बाक्स*कोळशावर उपकर*
अलीकडे राख कशी हाताळायची यावर कायदा तयार करण्यात आला असून कोळश्यावर प्रतिटन ४०० रुपये उपकर लावण्यात आला आहे माध्यमातून राष्ट्रीय स्वच्छ पर्यावरण निधी तयार केल्या जात आहे सन २०१४-२०१५ पर्यंत एकूण १७०.८४ अब्ज निधी जमा झाला असून या निधीचा वापर स्वच्छ ऊर्जेचे तंत्रज्ञान व संबंधित प्रकल्पासाठी केल्या जाणार आहे मात्र केंद्राकडे जमा असलेला निधी आणणार कोण असा प्रश्न माजी खासदार प्रकाश जाधव यांनी उपस्थित केला .
Maharashtra News Media सच की आवाज