Breaking News

*जागतिक महिला दिनाचं औचित्य कर्तृत्ववान महिलांचा सत्कार*

*जागतिक महिला दिनाचं औचित्य कर्तृत्ववान महिलांचा सत्कार*

कोंढाळी प्रतिनिधि- दुर्गाप्रसाद पांडे

कोंढाळी – जागतिक महिला दिनाचं औचित्य साधून कोंढाळी हुतात्मा स्मारक (ना.त.)कार्यालयाचे प्रांगणात कोविड १९च्या शासन-प्रशासनाच्या नियमावलीचे पालन करत कोंढाळी येथील परिसरातील कर्तृत्ववान महिलांचा सत्कार करण्यात आला.  या प्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष कोंढाळी चे नायब तहसीलदार निलेश कदम, तसेच कोंढाळी चे ठाणेदार विश्वास पुलरवार, डाॅ-अश्वीनी दातीर, महिला पत्रकार ज्योती तिवारी, धनश्री बापट,गीता सहारे यांचे प्रमुख उपस्थितीत सामाजिककार्यकर्त्यांएड- ॠणूजा गायकवाड यांनी स्वत:च्या पायावर उभे राहून स्वावलंबी होण्यासाठी झटणा-या महिलांचा सत्कार केला.

 

एड-ऋणूजा गायकवाड यांनी या प्रसंगी कृषी, वैद्यकीय, शैक्षणिक, आर्थिक, राजकीय, सामाजिक, क्षेत्रातात स्वतः आपल्या पायावर समर्थपणे उभे राहून स्वावलंबी होण्या साठी झटणार्या कर्तृत्ववान महिलांचा सत्कार करण्यात आला. यात डाॅ-निकिता आर जाधव, राजेश्वरी विनोदकुमार पांडे, निलिमा विजयराव सरोदे, कल्पना अतुल धर्मे, राखी महेश चरडे, मनिषा सुनिल धर्मे, वनिता अशोक चन्ने यांचा सत्कार करन्यात आला या प्रसंगी कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून ठाणेदार विश्वास पुलरवार यांनी सांगीतले की
महिला सशक्तिकरण दिवस. हा आम्ही सशक्त तर आधीपासूनच होतो. आमची शक्ती, आमचे शौर्य, बुद्धी यांची प्रचीती देवांपासून सर्वांनाच होती. पुराणामध्येही स्त्री शक्तीला वंदन केले आहेच. स्त्री ही अनादीकाळापासून शक्ती स्वरूपात आहे. बदलत्या परिस्थितीत त्याची परिभाषा जरूर बदलली आहे. राक्षसांचा संहार असो वा आणखी कोणते कठीण काम स्त्री सर्वदाच अग्रणी आहे. म्हणून महिला सशक्तीकरण हे आधुनिक नसुन पौराणिकच आहे.अशी माहिती ठाणेदार विश्वास पुलरवार यांनी या प्रसंगी दिली , तसेच मातृशक्ती ला कधी ही कुणीही त्रास दिला तर कोंढाळी पोलीस स्टेशनला सदैव आपल्या सोबत आहे अशी ग्वाही ठाणेदारांनी दिली.
तसेच! कार्यक्रमाचे आयोजक ऋणूजा गायकवाड यांनी प्रास्ताविकात सांगितले की र्आ आमचा विकास तर झालाच आहे. पण सर्वांगीण नाही. समाजाचा काही वर्ग खूप पुढे निघून गेला आहे. परंतु, काही वर्ग मागेच आहे. त्याचा विकास झाला नाही. अजूनही अनेक स्त्रिया अशिक्ष‍ित, अंधश्रद्धा, पतीची मारहाण, हुंडा अशा अनेक गोष्टींच्या बंधनात अडकलेल्या आहे. त्यांना परिवर्तनाची दिशा मिळालीच नाहीये. त्यांचा दिवस कोंबडं आरवण्याच्या आधी सुरू होतो आणि रात्रीच्या किरकिर होता संपतो. अजूनही त्या दोन वेळेची भूक भागवण्यासाठी ‘ठेविले अनंते तैसिची राहावे’ असे म्हणत नवर्‍याची मारहाण सहन करण्यात अख्खं आयुष्य घालवत असतात. पण या आरशाची एक बाजू फारच सुंदर आहे तर दुसरी तेवढीच कुरूप. ह्या दिवशी दहा मिनिटं थांबून जर विचार केला तर आपल्याला आत्मग्लानीच होईल, की आपण फक्त आपलाच विचार केला आहे. दुसर्‍याच्या नाही. आणि याची परिभाषा विकास आहे. तर तो फक्त स्व:विकासच आहे. 


या प्रसंगी नायब तहसीलदार निलेश कदम यांनी ही मोलाचे मार्गदर्शन केले.धनश्री बापट , राजेश्वरी पांडे, ज्योती तिवारी यांनी ही मार्गदर्शन केले, आयोजक ऋणूजा गायकवाड यांनी प्रास्ताविक व आभार व्यक्त केले.

Check Also

*उपाध्यक्ष बने राजु घुगल* *डॉ. विजय धोटे व मंदार मंगळे स्विकु्त नगरसेवक* *नगराध्यक्षा व नगरउपाध्यक्ष ने बनाया इतिहास*

🔊 Listen to this *उपाध्यक्ष बने राजु घुगल* *डॉ. विजय धोटे व मंदार मंगळे स्विकु्त …