*सामाजिक कार्यकर्ते रामुजी वानखेडे यांचे दुखःद् निधन*

*समाज बांधवात शोककळा*
नागपुर ः तेली समाज सामुहिक विवाह समितीचे अध्यक्ष ,सामाजिक कार्यकर्ते, मा . रामुजी वानखेडे यांचे आज दुःखद निधन झाले . ते समाजासाठी निस्वार्थ भावनेने समाज उत्थानासाठी प्रयासरत होते. कुणासाठी मदत करायची ठरवली तर जिव तोडून झटायचे ,मग निवडणूक असो की की एखाद्या कार्यक्रमाची तयारी असो त्यांना चैन च पडायची नाही , रात्र नि दिवस एक करायचे . कुणासाठी ,इतके झटतांना मी त्यांना फार जवळून बघितले . तुकडोजी महाराजांनी म्हंटले होते माणूस द्या मज माणूस द्या, आणि तोच खरा निस्वार्थ माणूस आपल्यातून हरवला . आणखी काही काळ त्यांचा सहवास व मार्गदर्शन आम्हाला लाभले असते तर आम्हाला सामाजिक कार्य करण्यास प्रेरणा मिळाली असती पण काळा ला मान्य नव्हते आणि एक चांगले पितातुल्य ,वाक्तिमत्व आमच्यातून हरवले अतिशय जड अंतकरणाने श्रद्धांजली अर्पण करीत आहे . निस्वार्थ भावनेने समाजा साठी झटणे हा संदेश त्यांची आठवण म्हणून आम्ही सदैव बाळगू असे विचार नयना संजय झाडे, माजी नगरसेविका अध्यक्ष – नागपूर विभागीय महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभा यांनी याप्रसंगी व्यक्त करत या दुखःद् प्रसंगातून वानखेडे परिवारास सावरण्याची हिम्मत इश्वर प्रदान करो तसेच आप्त परिवारासह समाजबांधवांनी समाजाकरिता अहोरात्र झटणारा खरा समाज हितचिंतक खोवला ही समाजाकरिता अपुर्णीय क्षती आहे असे मत व्यक्त केले.
Maharashtra News Media सच की आवाज