Breaking News

*कन्हान नदीचा नवीन पुलिया कधी पर्यंत पुर्ण होईल ?* *३१ मार्च पर्यंत अधिकार्यांनी दिले होते आश्वासन झाले खोटे* *ब्रिटिश कालीन कन्हान पुलिया मोजत आहे अखेरचा फटका*

*कन्हान नदीचा नवीन पुलिया कधी पर्यंत पुर्ण होईल ?*

*३१ मार्च पर्यंत अधिकार्यांनी दिले होते आश्वासन झाले खोटे*

*ब्रिटिश कालीन कन्हान पुलिया मोजत आहे अखेरचा फटका*

कन्हान प्रतिनिधि – ॠषभ बावनकर

कन्हान – कश्मीर ते कन्याकुमारी पर्यंत भारताच्या दोन टोकाला जोडणारा कन्हान नदी वरील पुल १८७४ मध्ये ब्रिटिश कंपनीने बांधला होता व हा पुलिया शंभर वर्ष सेवा देईल असा ब्रिटिश कंपनीने दावा केला होता . त्यानुसार १९७४ मध्ये कन्हान नदी पुलाला शंभर वर्ष पुर्ण झाल्याचे ब्रिटिश कंपनीने शासनाला सुचित केले होते . परंतु ब्रिटिश कंपनीने बांधकाम केलेल्या कन्हान नदीवरील पुलाला तब्बल जवळपास १४७ वर्ष पुर्ण झाले आहेत . सध्याचा परिस्थिति मध्ये हा कन्हान नदीचा पुलिया अतिशय जीर्ण झाला असुन अखेरचा फटका मोजत आहे . त्यामुळे हा पुलिया कधीपण धाराशाही होऊ शकतो याची दाट शक्यता वाढली असुन या पुला वरुन जड वाहन सुरुच आहे . दरम्यान सहा वर्षापासुन कन्हान नदीच्या नवीन पुलाचे बांधकाम सुरु केले असुन काम अतिशय कासवागतीने सुरु असल्याने कन्हान नदीचा नवीन पुलिया कधी पर्यंत पुर्ण होईल ? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे . कन्हान नदीच्या नवीन पुलाच्या बांधकामाची गती वाढवुन काम वेगाने पुर्ण करुन व पुलावरुन वाहतुकीस सुरु करुन जुना पुरातन कन्हान नदी वरील पुलाची राष्ट्रीय संपत्ती म्हणुन जोपासणा करावी अशी मागणी आता जोर धरु लागली आहे .अनेक उन्हाळे , पावसाळे तसेच मागील वर्षी आलेल्या महापुराचा साक्षीदार असलेला हा ब्रिटिश कालीन पुल गेल्या १४७ वर्षा पासुन अविरतपणे आपली सेवा देत द्विशतकाकडे वाटचाल करीत आहे . दरम्यान या पुलाची जीर्ण अवस्था पाहुण शासनाने नवीन पुल मंजुर करुन २०१४ मध्ये तत्कालीन सामाजिक न्याय मंत्री व रामटेक लोकसभा क्षेत्राचे खासदार मुकुल वासनिक यांचा प्रमुख उपस्थिती मध्ये नवीन पुलाच्या बांधकामाचे भुमिपुजन करण्यात आले . ३९० मीटर लांब असलेल्या नवीन पुलाच्या बांधकामाला जमीन अधिग्रहणासह ४६.४६ अनेक्षित आहे . जवळपास नवीन पुलाचे बांधकाम ८०% ते ८५% पुर्ण झाले आहे . कन्हान नदीच्या नवीन पुलाचे उर्वरित बांधकाम तात्काळ पुर्ण करुन वाहतुक सुरु करावे . अशी मागणी आता जोर धरु लागली आहे .

*काॅंग्रेस च्या धरणे आंदोलनात ३१ मार्च २०२१ पर्यंत नवीन पुलाचे बांधकाम पुर्ण होईल असे अधिकार्यांनी दिले होते आश्वासन झाले खोटे*

कन्हान नदीच्या नवीन पुलाचे बांधकाम तात्काळ पुर्ण करून वाहतुक सुरु करावे या मागणी करिता कन्हान काॅंग्रेस पार्टी द्वारे जिल्हाअध्यक्ष राजेंन्द्र मुळक यांचा नेतृत्वात शैकडो काॅंग्रेस पार्टी च्या पदाधिकार्यांनी कन्हान नदी जवळ २६ आॉक्टोंबर २०२० ला धरणे आंदोलन केले होते . या आंदोलनात पुलाच्या अधिकार्यांनी आश्वासन दिले होते कि कोणत्याही परिस्थिति मध्ये ३१ मार्च २०२१ पर्यंत कन्हान नदीच्या नवीन पुलाचे बांधकाम पुर्ण होईल . परंतु अधिकार्यांनी दिले आश्वासन खोटे सिद्ध झाले आहे . सध्याचा परिस्थिति मध्ये कन्हान नदीच्या नवीन पुलाचे रोलिंग चे काम पुर्ण झाले नसुन अप्रोच रोड चे काम पुर्ण झालेले नाही तसेच महामार्ग ४४ च्या दोन्ही बाजुला जोडण्याचे काम पुर्ण झालेले नसुन डांबरी करण चे काम पुर्ण झालेले नाही . त्यामुळे या कन्हान नदीच्या नवीन पुलिया चे पुर्ण बांधकाम कधी पुर्ण होईल व या पुलिया वरुन वाहतुक कधी पासुन सुरु होईल असा प्रश्न उपस्थित झाला असुन काॅंग्रेस पुन्हा आंदोलनाची भुमिका घेईल काय ? या कडे नागरिकांचे लक्ष वेधले आहे .

Check Also

*उपाध्यक्ष बने राजु घुगल* *डॉ. विजय धोटे व मंदार मंगळे स्विकु्त नगरसेवक* *नगराध्यक्षा व नगरउपाध्यक्ष ने बनाया इतिहास*

🔊 Listen to this *उपाध्यक्ष बने राजु घुगल* *डॉ. विजय धोटे व मंदार मंगळे स्विकु्त …