Breaking News

*कन्हान व कामठी येथे स्थानिक प्रशासनाने केली दुकाने बंद* *राज्य शासनाच्या नियमाचे पालन न करणार्यांवर नगर परिषद प्रशासना द्वारे दंडात्मक कार्रवाई शुरु* *शासनाच्या नियमाचे काटेकोरपणे पालन करा – कन्हान पोलीस प्रशासन व नप प्रशासनाचे नागरिकांना आव्हान*

*कन्हान व कामठी येथे स्थानिक प्रशासनाने केली दुकाने बंद*

*राज्य शासनाच्या नियमाचे पालन न करणार्यांवर नगर परिषद प्रशासना द्वारे दंडात्मक कार्रवाई शुरु*

*शासनाच्या नियमाचे काटेकोरपणे पालन करा – कन्हान पोलीस प्रशासन व नप प्रशासनाचे नागरिकांना आव्हान*

कन्हान प्रतिनिधि – ॠषभ बावनकर

कन्हान – महाराष्ट्र राज्यात कोरोना चा फैलाव अति वेगाने वाढत असल्यामुळे राज्य
शासनाने नियमावली कठोर केली असुन गर्दी टाळण्याकरिता राज्यात कलम १४४ लागु करण्यात आले असुन कन्हान व कामठी शहरात मंगळवार दिनांक ६ एप्रिल ला व्यापारांनी आपले दुकाने सुरु केली असता कन्हान व कामठी शहरातल्या पोलीस विभागाने व नगर परिषद प्रशासनाने दवंडी फिरवुन दुकाने बंद केल्याने व्यापारांनी नाराजगी व्यक्ती केली आहे .
महाराष्ट्र राज्यात कोरोना चा फैलाव थांबविण्याकरिता राज्य शासनाने नियमावली कठोर केली असुन गर्दी टाळण्याकरिता राज्यात कलम १४४ लागु करण्यात आले असुन सकाळी ७ ते ८ वाजेपर्यंत जमावबंदी म्हणजे ५ पेक्षा जास्त लोकांना एकत्र येण्यास मनाई करण्यात आली असुन रात्री ८ ते सकाळी ७ वाजे पर्यंत कोणत्याही व्यक्तीस योग्य कारण्याशिवाय बाहेर पडता येणार नाही . यातुन वैद्यकीय व इतर अतिआवश्यक सेवांना परवानगी देण्यात आली आहे . सध्याचा परिस्थितीत कोरोना विषानुचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता नगर परिषद क्षेत्रात दिनांक ०५ एप्रिल ते ३० एप्रिल २०२१ या कालावधीत राज्य शासनाने अतिआवश्यक सेवांची दुकान वगळता बाकी सर्व दुकानें करण्याचे आदेश जारी केले असुन किराणा , भाजीपाला , ई.जीवनिवश्यक वस्तु वगळता इतर सर्व प्रकारचे दुकाने माॅल्स , बाजारपेठा , दिनांक ३० एप्रिल २०२१ पर्यंत बंद करण्याचे आदेश दिले आहे . अतिआवश्यक वस्तु व सेवांच्या दुकानांतील दुकानदार व कर्मचार्यांनी लवकरात लवकर लसीकरण करुण घेण्यात यावे . तसेच स्वत व ग्राहकांन कडुन नियममाचे पालन होत आहे का नाही ते पाहावे . मनोरंजन व करमणुकीची स्थळे बंद करण्यात आली असुन सलुन , ब्युटी पार्लर , सभागृहे , जलतरण तलाव , जिम्स , धार्मिक स्थळे , प्रार्थना स्थळे , बंद करण्यात आले आहे . मात्र या ठिकाणी काम करणारे कर्मचारी व पुजारी वगैर यांना पुजा अर्चना करता येईल . उपहारगृहे व बार पुर्णपणे बंद करण्यात आले असुन उपगृहामध्ये एखाद्या हाॅटेलचा भाग असेल तर ते तेथे राहणार्या अभ्यागातासाठी सुरु ठेवता येईल बाहेर व्यक्तींनसाठी प्रवेशांवर बंदी घालण्यात आली असुन मात्र टेक अवे किंवा पार्सलची सुविधा सकाळी ७ ते रात्री ८ पर्यंत सुरु ठेवण्याचे आदेश जारी केले आहे . तसेच रस्त्याचा कडेला असणार्या खाद्य विक्रेत्यांचा सकाळी ७ ते ८ पर्यंत केवळ पार्सल सेवेसाठी व्यवसाय सुरु ठेवता येईल असुन पार्सलची वाट पाहनार्या ग्राहकांना सुरक्षित अंतर नियमाचे पालन करावे लागेल . पालन न केल्यास व्यवसायी दुकानें बंद करण्यात येईल असे आदेश जारी केले आहे . ई काॅमर्स सेवा नियमितपणे सकाळी ७ ते रात्री ८ या वेळेत सुरु राहील . होम डिलीव्हरी देणार्या कर्मचार्यांचे लसीकरण झालेले असणे अति आवश्यक असुन लसीकरण करुन घेई पर्यंत सदर कर्मचार्याने निगेटिव्ह आर टी पीसीआर प्रमाणपत्र सोबत ठेवने आवश्यक आहे . अन्यथा त्या व्यक्तीस १००० रुपये दंड आणि संस्थेस १०,००० रुपये दंड वसुल करण्यात येईल . वृत्तपत्रे छपाई व वितरण नेहमी प्रमाणे सुरु ठेवण्यात येईल मात्र विक्रेत्यांनी लसीकरण करुन घ्यावे . तसेच सार्वजनिक व खाजगी अशी सर्व प्रकारची वाहतुक नियमितपणे सुरु राहतील आॅटो रिक्षा मध्ये चालक व दोन प्रवासी , टॅक्सी मध्ये चालक व निश्चित केलेल्या प्रवांशापैकी ५० % टक्के प्रवाशी प्रवास करू शकतील . जे नागरिक बीना मास्क प्रवास करतांना आढळतील त्यांना 500 रुपये दंड वसुल करण्यात येईल . सार्वजनिक व खाजगी बसेस मध्ये उभे राहुन प्रवास करता येणार नाही परंतु सीट वर बसलेल्या प्रवाशांनाच परवानगी असणार व प्रवाशांनी मास्क घातलेला असावा . बस चालक वाहक व इतर कर्मचार्यांनी आपले लसीकरण पुर्ण करावे किंवा कोरोना निगेटिव्ह प्रमाणपत्र सोबत बाळगावे . बाहेर जाणार्या रेल्वे मध्ये सर्व साधारण डब्यात उभ्याने प्रवासी असु नयेत . तसेच प्रवासी मास्क घालतील याची काळजी रेल्वे प्रशासनाने घ्यायचे आहे . खाजगी कार्यालयीन पुर्णपणे वर्क फ्राॅम होम बंधनकारक राहील . केवळ बॅंका , स्टाॅक मार्केट , औषधी , मेडिक्लेम , दुरसंचार , अशी वित्तीय सेवा देणारी तसेच स्थानिक आपत्ती व्यवस्थापन वीज , पाणीपुरवठा , करणारी कार्यालय मात्र सुरु राहतील . लग्न समारंभासाठी जास्तीत जास्त 50 लोकांना उपस्थित राहण्याकरिता परवानगी देण्यात आली असुन सदर ठिकाणी उपस्थित व्यक्तीचे लसीकरण होणे आवश्यक असुन लसीकरण करण घेईपर्यंत सदर व्यक्तीने निगेटिव्ह आर टी पीसीआर प्रमाणपत्र सोबत ठेवने आवश्यक असुन अंतिम संस्कार च्या वेळेस जास्तीत जास्त २० लोकांना उपस्थित राहण्याची परवानगी देण्यात आली आहे .
अश्या प्रकारे राज्य शासनाने नियमावली कठोर केली असुन नियमाचे उल्लंघन केल्यास आपत्ती व्यवस्थापन कायदा २०१५ चे कलम ५१ व ५६ आणि भारतीय दंड संहिता चे कलम १८८ अंतर्गत आवश्यक दंडात्मक कारवाई करण्यात येईल . असे सर्व नियमाचे पालन करुन शहराला कोरोना मुक्त करण्याकरिता प्रशासनाला सहकार्य करावे असे आव्हाहन कन्हान – पिपरी नगरपरिषद प्रशासन व कन्हान पोलीस प्रशासनाने नागरिकांना केले आहे .

Check Also

*उपाध्यक्ष बने राजु घुगल* *डॉ. विजय धोटे व मंदार मंगळे स्विकु्त नगरसेवक* *नगराध्यक्षा व नगरउपाध्यक्ष ने बनाया इतिहास*

🔊 Listen to this *उपाध्यक्ष बने राजु घुगल* *डॉ. विजय धोटे व मंदार मंगळे स्विकु्त …