Breaking News

*मोवाड शहरात पाणी पुरवठा व घनकचऱ्याचे वाजले तिन तेरा* *भाजप चे मुख्यधिकाऱ्यांना निवेदन* *नागरिकांचा मुख्यधिकाऱ्याच्या घराला घेराव*

*मोवाड शहरात पाणी पुरवठा व घनकचऱ्याचे वाजले तिन तेरा*

*भाजप चे मुख्यधिकाऱ्यांना निवेदन*

 

*नागरिकांचा मुख्यधिकाऱ्याच्या घराला घेराव*

 नरखेड तालुका प्रतिनिधि – श्रीकांत मालधुरे

मोवाड – शहरात कोरोना च्या महामारीने सर्व सामान्य माणसाच्या जगने हे त्रासदायक होत आहेत.यामध्ये जर पिण्याच्या पाण्याचा अनियमित निर्माण झाला तर लोकांनी काय पिण्याचे पाणी नपिताच त्रास व्हावे त व स्वच्छता ही सुद्धा महत्त्वाची आहेत.गेले अनेक दिवसांपासून डिजेल नसलेमुळे घंटागाडी येत नव्हती म्हणून मोवाड शहरातील नागरिक मध्ये पुन्हा नगर परिषद शासना विरुद्ध रोष निर्माण झाला.

शहरात मागील ८-१० दिवसापासून नळाला पाणी पूरवठा होत नसल्याने नागरिकामध्ये चांगलीच चिड निर्माण झाली आहे. शहरातील वार्ड क्र. ३ , ४ , ५ , ६ या वार्डात मागील पाच दिवसापासून पाणी पुरवठा खंडीत आहे . तर शहरातील उरलेल्या वार्डात कधी नळ येतो तर कधी नाही आशी आवस्था झाली आहे.
उन्हाळ्याचे दिवस सुरू झाले असून नागरिकांनच्या घरी प्यायला सुध्दा पाणी नसल्यामुळे नागरिकांत मोठा संताप निर्माण झाला आहे. मंगळवार रात्री नागरिकांनी सरळ मुख्यधिकारी यांच्या निवासस्थानी घेराव टाकला . या घेरावात नागरीकांची आपल्या घरातील गुंड व पाण्याच्या डबक्या घेऊन गेले होते. पण मात्र नागरिकांना मुख्यधिकारी यांनी पोलीस प्रशासनाच्या माध्यमातून हकलून लावले . त्यामुळे नागरिकात चांगलाच रोष निर्माण झाला आहे.

तर दुसरीकडे भाजपच्या शिष्ठमंडळाने मुख्यधिकारी पल्लवी राउत यांची भेट घेऊन त्यांना निवेदन दिले. शहरातील पाणी पुरवठा सुरळीत करण्याची मागणी भाजप पदाधिकाऱ्यांनी केली. गेल्या दहा दिवसापासून कचरा गाड्या बंद असल्यामुळे त्या सुरळीत सुरु करण्याची मागणी भाजप पदाधिकारी सुरेश खसारे ,रवी माळोदे , दिनेश पांडे , ईस्माईल बारुदवाले , वासुदेव बनाईत , नामदेव वाडबुध्दे सह भाजप पदाधिकाऱ्यांनी केली.

Check Also

*सावनेर शेगाव बस सुरु* *नगराध्यक्षा संजना मंगळे यांनी दाखवली हिरवी झंडी*

🔊 Listen to this *सावनेर शेगाव बस सुरु* *नगराध्यक्षा संजना मंगळे यांनी दाखवली हिरवी झंडी* …