*वेलतुर येथे तीन दुकाने व घर आगीत भस्मसात*
*९६ लाखांचे नुकसान*

कुही प्रतिनिधि
कुही- तालुक्यातील वेलतुर बस स्थानक परिसरात असलेल्या तीन दुकानांना काल मध्यरात्री एक वाजताच्या सुमारास अचानक आग लागल्याने आगीत तिन्ही दुकाने भस्मसात झाली असून जवळपास ९६ लाखांचे नुकसान झाल्याची घटना घडली.या आगीमुळे पीड़ित कुटुंबियांचे अतोनात नुकसान झाले असून त्यांचा संसार उघड्यावर आला आहे.
प्राप्त माहितीनुसार वृत्त असे की बस स्थानक जवळ कुलरकर परिवाराचे दोन मजली घर व दुकान आहे .यामध्ये मनोज कुलरकर हे किराणा व बूट हाऊस असे दोन दुकान चालवतात तर त्यांचे भाऊ मंगेश याचे जनरल व किराणा आहे.नेहमी प्रमाणे दिवसभर दुकानाचा धंदा करुन रात्री साडे आठ वाजताच्या दरम्यान दुकान बंद करुन दोघेही आपापल्या घरी गेले.जेवण करुन रात्री आराम करीत असताना रात्री एक वाजताच्या सुमारास वादळासह मुसळधार पावसाला सुरुवात झाली.सोबतच विजेचा कडकडाट झाला. या विजेच्या कडकडाटाने घरात विद्युतचे शॉर्ट सर्किट झाले असावे असा आग लागल्याचा प्राथमिक अंदाज प्रथम दर्शनी वर्तविण्यात येत आहे.यातच आवाजाने घरातील सदस्य जागे झाले. त्यांना दुकानातून धूर निघत असल्याचे दिसल्याने ते ख़ाली आले तर येऊन पाहातात तर काय दुकानाला आग लागल्याचे लक्षात आले.पाहता पाहता आगीने क्षणात रौद्ररूप धारण केले .घटनेची माहिती पोलिसांना कळताच ठाणेदार आनंद कविराज आपल्या ताफ्यासह घटना स्थळी दाखल झाले .घटनेची माहित्ती आमदार सुधीर पारवे यांना दिली. त्यांनी रात्रीच अग्निशामक दलाला माहिती देऊन दोन फायर ब्रिगेड च्या गाड्या पहाटे चार वाजतच्या दरम्यान गावात पोहचल्या.परंतु तो पर्यंत आगीने आपले रुद्र रूप धारण करून घरा सह दुकाने जळून खाक झाले.ही आग इतकी भयानक होती की, घराच्या सिमेंटच्या भिंतींना तडे गेले.मुसळधार पाऊस आल्याने वीजपुरवठा रात्रभर बंद होता. त्यामुळे घराघरात बोअरवेल असूनही नागरिक आग विझवू शकले नाही.पहाटे अग्निशमन बंब आल्याने सकाळ पर्यंत आगीवर नियंत्रण मिळविण्यात आले.या आगीत कुलरकर कुटूंबियांचे सुमारे ९६ लाखांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे .मात्र आग कशामुळे लागली.याचे मुख्य कारण कळू शकले नाही .
घटनास्थळी नायब तहसीलदार उमेश अंबादे, मंडळ अधिकारी अरुण रामटेके,तलाठी वाय.डी.रामटेके,कोतवाल ईश्वर नेवारे यांनी पाहणी करून घटनेचा पंचनामा केला व अहवाल वरिष्ठाना पाठविला आहे .दरम्यान आज दुपारी आमदार सुधीर पारवे यांनी भेट देऊन त्यांना सांत्वना दिली.पुढील तपास सुरू आहे.
Maharashtra News Media सच की आवाज