*3 दिवसात धडक सिंचन विहीर अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करा अन्यथा आंदोलन युवा स्वाभिमान पार्टी चे दिलीप पोटफोडे यांचा इशारा*
वर्धा प्रतिनिधि – पंकज रोकड़े
आर्वी – दिनांक 19/05/2021ला मा जिल्हाधिकारी व जिल्हापरिषद मुख्य कार्यकारी अधिकारी यांना मार्फत.गटविकास अधिकारी आर्वी पं स द्वारा निवेदन सादर.
गटविकास अधिकारी आष्टी येथे चार्जवर असल्याने कनिष्ठ अभियंता तसरे यानी निवेदन स्वीकारले गटविकास अधिकारी यांच्याशी दूरध्वनी वर चर्चा… लघु सिंचन विभागाचे उपविभागीय अभियंता साबळे यांच्याशी भेटून चर्चा तीन दिवसाचा अल्टिमेटम .एकमेकांवर ढकलू नका शेतकऱ्यांच्या खात्यात रक्कम जमा करा.. दिलीप पोटफोडे आक्रमक
पंचायत समिती व लाघुसिंचन ने तात्काळ सर्व प्रक्रिया पूर्ण करा स्वाभिमानी सैनिक संतापले.
सविस्तर वृत्त असे कि तात्कालिन सरकार द्वारा विदर्भातील मागासलेल्या व आत्महत्या ग्रस्त 6 जिल्ह्यातील दुर्बल शेतकऱ्यांना आधार देता यावा सिंचन क्षेत्रात वाढ व्हावी या दृष्टीने 2018-2019ला धडक सिंचन विहीर कार्यक्रम विदर्भात 6 जिल्ह्यात राबविण्यात आला त्यात वर्धा हा मागासलेला जिल्हा म्हणून समावेश करण्यात आला यात प्रामुख्याने त्या शेतकऱ्यांना प्राधान्य होत जे आर्थिक दुर्बल, दारिद्र्य रेषेखालील, निराधार, व शेतकरी आत्महत्या ग्रस्त कुटुंबाला या योजनेचा फायदा घेता येईल हे लाभ घेणाऱ्या शेतकऱ्यांना निकष या योजनेसाठी होते म्हणजेच पूर्णतः मोडलेल्या शेतकऱ्यांना आधार देण्याच्या दृष्टीने ही योजना होती परंतु सरकार बदललं आणि अनुदान रखडलं त्यात कोरोना विषाणू ने थैमान माजवला अशात शेतकरी पूर्णतः खची झाला पात्र लाभार्थी ज्यांनी विहीर खोदली आणि बांधली तो आता हताश झाला अगोदर च परिस्थिती चा मारा त्यात होत नव्हतं जवडचा पैसा अडका लावला काहींनी दाग दागिने मोडले तर काहींनी कर्ज काढले परंतु वर्ष दीड वर्षांपासून अनुदान रखडलं अशात या शेतकऱ्यांचे शिष्टमंडळाने सरपंच संघटना चे प्रा राऊत व युवा स्वाभिमान पार्टी चे विधानसभा अध्यक्ष दिलीप शा. पोटफोडे यांची भेट घेतली त्यांना आपली व्यथा सांगितली आणि लगेच प्रा राऊत व दिलीप शा. पोटफोडे यानी राष्ट्रवादी काँ,चे वर्धा जिल्ह्याचे नेते अभिजित फाडके पाटील यांच्याशी संपर्क साधून ही गंभीर परिस्थिती ठेवली त्यांनी लागलीच जलसंपदा मंत्री ना. जयंत पाटील यांना या बाबतीत अवगत केले दिनांक 17/मार्च /2021 ला मुंबई च्या जलसंपदा मंत्र्याच्या दालनात बैठक लावली येथून शेतकऱ्यांच शिष्टमंडळ दिलीप शा. पोटफोडे यांच्या नेतृत्वात अभिजित फाडके पाटील यांच्या पुढाकारात मुंबई मंत्रालयात धडकल आणि जिल्ह्यातील शेतकरी आज कसा मेटाकुटीस आला त्याची परिस्थिती किती गंभीर आहे हे अतिशय जबाबदारी ने जयंत पाटील यांच्या समोर शिष्टमंडळाने मांडल आणि ना. जयंत पाटील यानी तात्काळ मुख्य सचिवांना निर्देश देत 6 जिल्ह्यात वर्धा जिल्ह्याला प्राथमिकता देत 10 कोटी चि पूर्ण रक्कम एकमुश्त निधी उपलब्ध करून दिला तसा शासन निर्णय दिनांक 26/मार्च /2021 ला काढला लागलीच नागपूर विभागीय आयुक्त यांना निधी वडता केला इतक्या वरच न थांबता रा कॉ चे फाडके राऊत पोटफोडे यानी पाठपुरावा करून तो वर्धा जिल्हाधिकारी, जिल्हापरिषद मुख्य कार्यकारी अधिकारी ते जिल्ह्यातील सर्व पंचायत समिती ना उपलब्ध करून एकमहीन्याचा कालावधी लोटला ही सर्व धावपळ करण्याच कारण कि शेतकऱ्यांना उर्वरित काम करण्यासाठी किंबहुना काहींनी जवड चा तर काहींचा उधार वाडीचा पैसा अडका मोकळा होऊन पावसाळ्या आधी शेती च्या कामात पडावा परंतु प्रशासनाच्या उदासीन कारभारा मुळे शेतकरी पुन्हा अडचणीत येण्याची चिन्ह दिसते आहे पंचायत समिती आर्वी आष्टीला शेतकरी चकरा मारून बेजार झालेत ला पं स त निधी येऊन पडला आहे परंतु शेतकऱ्यांचा खात्यात हा निधी वडता करण्यासाठी पुन्हा शेतकऱ्यांचि आहुती चि पंचायत समिती व प्रशासन वाट पाहत आहे का हा प्रश्न सध्या उपस्थित झाला आहे याची तक्रार शेतकऱ्यांनी दिलीप पोटफोडे यांच्याकडे केली असता युवा स्वाभिमान द्वारा प्रशासनाला जाब विचारला आहे आणि तीन दिवसात आर्वी आष्टी कारंजा तालुक्यातील सर्व शेतकऱ्यांचे थेट खात्यात रक्कम जमा झाली नाही तर उग्र आंदोलन केल्या जाईल असा इशारा या वेळी निवेदनातून देण्यात आला आहे… कमलेश चिंधेकर, सिद्धांत कळंबे, व शेतकरी उपस्थित होते.
Maharashtra News Media सच की आवाज