*देशाला पूर्णतः कोरोनामुक्त करण्यासाठी लसीशिवाय पर्याय नाही –डॉ. अरविंद देशमुख*
नागपुर उपजिल्हा प्रतिनिधी – दिलीप येवले
नागपुर:- कोराडी येथील तायवाडे महाविद्यालयातील मराठी विभाग, सूक्ष्म जिवशास्त्र विभाग आणि विस्तार कार्य समितीच्या संयुक्त विद्यमाने *कोरोना महामारी :समज, गैरसमज आणि शंका निरसन* या परिचर्चेचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील सूक्ष्म जिवशास्त्र विभागाचे माजी प्रमुख, अखिल भारतीय सूक्ष्म जिवशास्त्र संस्थेचे अध्यक्ष सुप्रसिद्ध सूक्ष्मजिवशास्त्रज्ञ् डॉ. अरविंद देशमुख यांनी कोरोना या आजाराच्या उगमपासून तर त्याच्या जगतावर झालेल्या प्रभावापर्यंत, त्या आजाराची लक्षणें, त्यापासून बचावासाठी उपचार, कोरोना झाल्यानंतर घ्यावयाची काळजी यासंदर्भात विस्तृत विवेचन केले. यावेळी उपस्थितांनी विचारलेल्या प्रश्नांची समाधानकारक उत्तरे देऊन कोरोना या आजाराच्या संदर्भात जनजागृती घडवून आणली. कोरोना हा विषाणू चिनच्या ऊहान प्रयोगशाळेत निर्माण झालेला मानवनिर्मित विषाणू आहे.

2015पासून या विषाणूला बाहेर पडू देऊ नका म्हणून शास्त्रज्ञ् सुचवत होते. पण या प्रयोगशाळेच्या चुकीने बाहेर पडलेल्या या विषाणूने संपूर्ण जग वेठीस धरलं. प्रचंड प्रमाणात झालेल्या जिवहाणी, महामारी चा सामना सर्वाना करावा लागत आहे. यासाठी सर्वांचे लसीकरण होणे हाच एकमेव पर्याय आहे. यापासून वाचण्यासाठी सर्वांनी नित्यानेमाने मास्कचा वापर करणे, शारीरिक अंतर पाळणे, वारंवार साबणाने हात धुणे या महत्वपूर्ण गोष्टी नित्याने करणे आवश्यक असल्याचे सरांनी सांगितले. याप्रसंगी महाविद्यालयाच्या प्राचार्य या परिचर्चेच्या अध्यक्ष डॉ. शरयू तायवाडे यांनी कोरोनाने झालेल्या हानीची वास्तविकता मांडून त्याचे गांभीर्य सांगितले व या आजाराचा समजून सामना करण्यासाठी समाजजागृती करणे आवश्यक आहे त्यासाठीच या कार्यक्रमाचे नियोजन करण्यात आल्याचे विषद केले. याप्रसंगी मान्यवरांचा परिचय डॉ. विजय चरडे यांनी करून दिला कार्यक्रममागील भूमिका डॉ कोमल ठाकरे यांनी मांडली व आभार डॉ. राजेंद्र वाटाणे यांनी मानले. दूरदृष्ट प्रणालीने संपन्न झालेल्या कार्यक्रमाला विद्यार्थी, पालक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व नागरिक बहुसंख्येने उपस्थित होते.
Maharashtra News Media सच की आवाज