*पावसाळयापुर्वी शहरातील सांडपाणी नाल्याची साफ सफाई करण्याची मागणी*
*ग्रामोन्नती प्रतिष्ठाण कन्हान चे नगरपरिषद मुख्याधिकार्यांना निवेदन*
कन्हान प्रतिनिधि – ॠषभ बावनकर
कन्हान : – पावसाळा सुरु होण्यासाठी काही दिवस शिल्लक असुन कन्हान-पिपरी नगरपरिषद अंतर्गत कन्हान शहरातील नाली व नाल्याची व्यवस्थित साफ सफाई होत नसल्याने पावसाळा लागण्यापुर्वी शहरातील सांडपाणी निकासी नाली व नाल्याची व्यवस्थित साफ सफाई करण्याची मागणी ग्रामोन्नती प्रतिष्ठाण व्दारे
न प मुख्याधिकारी गिरीष बन्नोरे यांना निवेदन देऊन मागणी करण्यात आली.
गुरूवार (दि.२७) मे २०२१ ला ग्रामोन्नती प्रतिष्ठाण कन्हान-पिपरी चे अध्यक्ष व माजी खासदार प्रकाश भाऊ जाधव यांच्या नेतृत्वात नगरपरिषद मुख्याधिकारी गिरीश बन्नोरे यांना भेटुन पावसाळयापुर्व व्यवस्थापनावर चर्चा करून पावसाळयांचे दिवस जवळ येत असुन कन्हान-पिपरी शहरातील लोकवस्तीचे सांडपाणी निकासी करण्यार्या नाली व नाल्याची आता पर्यंत व्यवस्थित साफ सफाई झाली होत नसल्याने शहरात कोरोना विषाणु संसर्गाचा प्रादुर्भावाने बिकट परिस्थितीशी लढा देत असतांना नगरपरिषद क्षेत्रातील लोकवस्तीचे सांडपाणी वाहणारी नाली व मोठया नाल्यात गाळ साचुन पावसाळया च्या पाण्याच्या निकासी करिता अडथळा निर्माण होऊ ने व पावसाचे पाणी लोकवस्ती मध्ये शिरून नुकसान होऊ नये म्हणुन तात्काळ शहरातील मुख्य नाल्याची तातडीने गाळ काढुन स्वच्छता करण्यात यावी. अश्या मागणी चे निवेदन देऊन करण्यात आल्याने मुख्याधिकारी गिरीष बन्नोरे यांनी संबधित अधिकार्यांना येणार्या ३० तारखे पर्यंत युध्द पातळीवर सांडपाणी निकासी नाली व नाल्याची व्यवस्थित साफ सफाई करण्यांचे आदेश दिले. याप्रसंगी ग्रामोन्नती प्रतिष्ठाण कन्हान-पिपरीचे अध्यक्ष व माजी खासदार प्रकाश जाधव, दिलीप राईकवार, मोतीराम रहाटे, नगरसेवक राजेंद्र शेंदरे, अजय ठाकरे, प्रविण गोडे, प्रशांत मसार सह आदि नागरिक प्रामुख्याने उपस्थित होते.
Maharashtra News Media सच की आवाज