Breaking News

*ओबीसी आरक्षणा करिता महाराष्ट्र सरकारने सुप्रिम कोर्टात फेरविचार याचिका दाखल करावी* *मा. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे साहेबांना निवेदना व्दारे मागणी.*

*ओबीसी आरक्षणा करिता महाराष्ट्र सरकारने सुप्रिम कोर्टात फेरविचार याचिका दाखल करावी*

*मा. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे साहेबांना निवेदना व्दारे मागणी.*

कन्हान प्रतिनिधि – ॠषभ बावनकर

कन्हान : – ओबीसी आरक्षण स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकी मधील सुप्रीम कोर्टाने आरक्षण रद्द केल्या चा निर्णय दिल्या बद्दल महाराष्ट्र सरकारने सुप्रिम कोर्टात फेरविचार याचिका दाखल करावी . अशी मागणी मा. मुख्यमंत्री उध्दव ठाकरे साहेबांना विनंती निवेदन पाठवुन ओबीसी समाज बांधवाच्या वतीने नमो नमो मोर्चा राष्ट्रीय अध्यक्ष विजय हटवार हयांनी केली आहे.

ओबीसी समाजाचे आरक्षण सुप्रीम कोर्टाने रद्द केल्याचा निर्णय दिला असल्याने ओबीसी समाज बांधव व भगिनींवर स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुक मध्ये ओबीसी आरक्षणात निवडणुक लढवता येणार नाही. हा एक प्रकारे खुप मोठा अन्याय झाला आहे. यामुळे महाराष्ट्र सरकारने सुप्रीम कोर्टात फेर विचार याचिका दाखल करावी . व ओबीसी समाजाला न्याय देण्यात यावा. तसेच (दि.७) मे ला अजितदादा पवार साहेबांनी नोकरी मधील ओबीसी प्रमोशन आरक्षण थांबविण्याचा जी आर काढलेला आहे. महाराष्ट्र राज्य सरकारने ओबीसी बांधवावर भयंकर मोठा अन्याय होत आहे. महाराष्ट्र सरकारने ओबीसी समाजाच्या प्रगती करिता न्याय हक्काची दखल घेत योग्य भुमिका घेऊन न्याय मिळवुन दयावा. ओबीसी समाजाच्या न्याय हक्का करिता आपण लढुन न्याय मिळवुन दिल्यास ओबीसी समाज खंभीर पणे आपल्या सोबत राहील. अन्यथा शांत सर्व ओबीसी समाजाला एकत्र येऊन महाराष्ट्र राज्यभर आंदोलन करण्याची पाळी येऊ देऊ नका. अशी विनंती निवेदन देऊन महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री मा. उध्दव ठाकरे साहेबांना ओबीसी समाज बांधवाच्या वतीने राष्ट्रीय अध्यक्ष नमो नमो मोर्चा भारत व राष्ट्रीय प्रभारी ओबीसी नमो नमो मोर्चा भारत हयांनी केली आहे.

Check Also

*नन्ही रोजेदार – कु.जामिया जमिर शेख*

🔊 Listen to this *नन्ही रोजेदार* सावनेर ः पवित्र रमजान के अवसरपर शहरकी पाच वर्षीय …