Breaking News

*पेंच नवेगाव खैरी धरणात ९६.०९टक्के पाणीसाठा,एकुण तीन गेट ०.३. मिटर ने २२३६ क्युसेस पानी विसर्ग – पारशिवनी उपविभागीय अभियंता*

*पेंच नवेगाव खैरी धरणात ९६.०९टक्के पाणीसाठा,एकुण तीन गेट ०.३. मिटर ने २२३६ क्युसेस पानी विसर्ग – पारशिवनी उपविभागीय अभियंता*

 

पारशिवनी तालुका प्रतिनिधी – कमलसिह यादव

पारशिवनी –  तालुक्यातील नवेगांव खैरी धरण पेंच प्रकल्पा मध्ये उपविभागीय अभियंता ,व शाखा अभियंता यांचे व्दारे मिळाली माहिती प्रमाणे पेंच धरणात एकुण साठाशुक्षवार रात्रिच्या पाणी पातळी ३२४.७५एम सि एम मीटर असुन शुक्रवार रात्रिचा साठा १३६.४४७ दलघनमीटर एम सि एम असुन साठा ९६.०९ % टक्केवारी आहे आणि धरणाचे परिचलन आराखड्या नुसार पेंच प्रकल्पा मधुन शुक्रवारी दिनांक ११ जुन २०२१ ला दुपारी वेळ — १२.३०-वाजता एक दरवाजे ०.३मीटर (१फुट)ने उघडुन त्यामधुन एकुण विसर्ग ३१.६८ (क्युमेक) पानी पेंच नदी पात्रात सोडले ,नंतर शुक्रवार (दि ११जुन)रात्रि ९.३०वाजता पुन्हा दोन गेट ०.३मिटर ने उघडले असुन तिन ही गेट मधुन २२३६ क्युसेस पाणी चा विसर्ग होऊन पेच नदीत सोडले आहे या संबंधित अधिकारी व कर्मचारी यांच्या उपस्थिती मध्ये सोडण्यात आला आहे व काही गेट केव्हा ही पाण्याची पातळी वाढेल त्या नुसार नदी पात्रात पाण्याचा विसर्ग वाढविण्यात येईल . अशी माहीती पेच पाटबंधारे उप विभागिय आभियंता प्रणय नागदिवे व शाखा आभियंता विशाल दुपारे यांची सागींतले व यांची कृपया नोंद घेत पारशिवनी तालुक्यातील नदी काठा वरिल सर्व गावा मध्ये दवंडी द्वारे लोकांना तसेच नदी काठावरील नागरिकांना नदी पात्रात जाऊ नये व सतर्क राहण्याबाबत दक्षता व काळजी घेण्याबाबत कळविण्यात यावे तसेच गावात,जंगलात गुरे , ढोरे , व इतर नुकसान होणार नाही याची दक्षता व काळजी घेण्याची विनंती करण्यात येत असुन वरील सोडणायात येणाऱ्या पुराचा पाण्यातुन लोकांना व गुरे ढोरे जाणे येणे करण्यात मनाई करण्यात आली आहे.

Check Also

*नन्ही रोजेदार – कु.जामिया जमिर शेख*

🔊 Listen to this *नन्ही रोजेदार* सावनेर ः पवित्र रमजान के अवसरपर शहरकी पाच वर्षीय …