Breaking News

*आता!सुबोध मोहिते राष्ट्रवादी कांग्रेस मधे*

*आता!सुबोध मोहिते राष्ट्रवादी कांग्रेस मधे*

पुणे-२५ जून पुणे शहरातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नव्या कार्यालयाच्या उद्घाटनाच्या मुहर्तावर विदर्भातील नेते माजी खासदार श्री. सुबोध मोहिते यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. श्री. मोहिते यांनी संसदेत प्रभावी वक्ता म्हणून काम केले आहे. मंत्री म्हणूनही त्यांनी चांगले काम केले. विदर्भामध्ये त्यांच्या कार्याचा राष्ट्रवादीला निश्चित फायदा होईल. त्यांच्यासह आलेल्या सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या पक्षप्रवेशाचे मी स्वागत करतो.

या निमित्ताने उपस्थित राहिलेल्या पुण्यातील पत्रकारांशीही संवाद साधला. दिल्लीतील घडामोडींविषयी पत्रकारांना कुतुहल होते. मागच्या सहा महिन्यांपासून शेतकऱ्यांचे संघटन दिल्लीत आंदोलनाला बसले आहे. हे आंदोलन बिगर राजकीय आहे. परंतु संसदेमध्येसुद्धा या विषयासंदर्भात मुद्दे कसे मांडता येतील असा विचार पुढे आला. म्हणून काही संघटना व कोणताही राजकीय अभिनिवेश न ठेवता काही पक्षांनी एकत्रित येऊन, चर्चा करून व्हाइट पेपर तयार करावा आणि आपली भूमिका मध्यवर्ती सरकारकडे मांडावी या हेतूने दिल्लीत बैठक घेतली.

या बैठकीत तिसरी आघाडी वगैरे असा विषय नव्हता तरीही जर केंद्रातील सध्याच्या सत्ताधाऱ्यांसमोर पर्यायी शक्ती उभी करायची असेल तर काँग्रेससह सर्व पक्षांना सोबत घ्यावे लागेल, असे माझे मत मी या राष्ट्र मंचच्या बैठकीत मांडले.

आज महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांची पुन्हा चौकशी झाली यात काही नवीन नाही. सत्तेचा दुरुपयोग करण्याचा हा पायंडा केंद्रातील राज्यकर्त्यांनी दाखवला आहे. आम्हाला या गोष्टीची यत्किंचितही चिंता वाटत नाही. आतापर्यंतच्या चौकशीतून हाती काहीच लागले नाही, त्या नैराश्यातून आणखी काही त्रास देता येईल का असा प्रयत्न आहे. जो राजकीय विचार आपल्याला मान्य नाही तो विचार दडपण्याचा प्रयत्न या यंत्रणांमार्फत केला जात आहे. हे आता काही नवीन राहिलेलं नाही.

काश्मीरच्या दर्जासंबंधी काल जे पंतप्रधानांनी सांगितलं त्यांचं आम्ही स्वागत करतो. त्याआधीही काश्मीरला स्वतंत्र दर्जा होता. जवाहरलाल नेहरू पंतप्रधान असताना त्यावेळी जो निर्णय झालेला होता तो अनेक वर्षे राबवला गेला. हा दर्जा काढून घेण्याचा निर्णय आजच्या राज्यकर्त्यांनी केला होता. त्याचे परिणाम वाईट होतील हे आम्ही सगळे सांगत होतो. परंतु आमचं न ऐकता हे निर्णय घेतले गेले. वर्ष-दीड-वर्षाने का होईना आपला हा निर्णय योग्य नाही या निर्ष्कर्षाप्रत राज्यकर्ते आले आणि तो निर्णय बदलायची तयारी त्यांनी दाखवली, आम्ही त्याचं स्वागत करतो.

प्रश्न असा आहे की देशाच्या पंतप्रधानांनी काश्मीरमध्ये जाऊन नऊ ते दहा गोष्टी आम्ही तातडीने करू असं जाहीर केलं होतं. आजपर्यंत त्यातली एकही गोष्ट झालेली नाही, हे काश्मीरमधली तरुण पिढी आम्हाला सांगते. पुन्हा एकदा त्यांनी काश्मीरच्या सर्व तरुण नेत्यांना बोलावलं. त्यांच्याशी चर्चा करण्याचा प्रयत्न केला हा देशाच्या ऐक्याच्या दृष्टीने योग्य पाऊल आहे. पण मागे जसं त्यांनी जाहीर केलं आणि काही झालं नाही तसं होऊ नये अशी अपेक्षा आहे.

Check Also

*उपाध्यक्ष बने राजु घुगल* *डॉ. विजय धोटे व मंदार मंगळे स्विकु्त नगरसेवक* *नगराध्यक्षा व नगरउपाध्यक्ष ने बनाया इतिहास*

🔊 Listen to this *उपाध्यक्ष बने राजु घुगल* *डॉ. विजय धोटे व मंदार मंगळे स्विकु्त …