Breaking News

*भाजपचे ओबीसी आरक्षण बहाल करण्यासाठी धरणे आंदोलन व चक्का जाम*

*भाजपचे ओबीसी आरक्षण बहाल करण्यासाठी धरणे आंदोलन व चक्का जाम*


प्रतिनिधी नरखेड तालुका श्रीकांत मालधुरे

जलालखेडा / नरखेड – ओबीसीना आरक्षण बहाल करण्याची मागणी घेवून आज दि 26 ला भाजपाच्या वतीने चक्का जाम व धरणे आंदोलन करून ओबीसीना आरक्षण मिळे पर्यंत राज्यातील जि प व प स पोटनिवडणुका रद्द करण्याची मागणी या आंदोलनाच्या माध्यमातून करण्यात आली. त्यांच बरोबर ओबीसीना विविध समस्यांचा सामना करावा लागेल. विद्यार्थ्यांनी शैक्षणिक सुविधा मिळणार नाही. म्हणजेच ओबीसी समुदाय आर्थिक,सामाजिक  विकास पासुन वंचित राहील असे मनोगतही व्यक्त केले.

जोर जुल्म की टक्कर में, संघर्ष हमारा नारा है..युवा मोर्चा

छत्रपती शाहू महाराज जयंतीदिनी भाजपच्यावतीने राज्य सरकारविरोधात नरखेड येथे राज्यव्यापी चक्काजाम आंदोलन करण्यात आले.

४ मार्च २०२१ रोजी सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकालानुसार राज्यात २७ टक्के ओबीसी आरक्षण संपविण्यात आले. एकीकडे ओबीसी च्या नावाखाली मते घ्यायची, मोठे मोठे मोर्चे काढायचे, आंदोलने करायची आणि लोकांना सांगायचे की ओबीसी आरक्षण कमी होऊ देणार नाही आणि दुसरीकडे मात्र ओबीसी समाजाच्या विरोधात षडयंत्र रचून ओबीसी आरक्षण राज्यात संपवन्याचा खेळ या महाभकास आघाडी सरकारने केलेले आहे. महाविकास आघाडी सरकारच्या दुर्लक्षित धोरणामुळे ओबीसी, मराठा व मागासवर्गीयांचे पदोन्नतीतील हक्काचे आरक्षण हे सरकार वाचवू शकले नाही.
तसेच १५ महिने राज्य मागासवर्ग आयोग तयारच केला नाही. केवळ न्यायालयात तारखा मागत राहिले. त्यामुळे ५० टक्क्याच्या आतले सुद्धा ओबीसी आरक्षण रद्द होण्याचे पाप हे केवळ आणि केवळ महाविकास आघाडी सरकारचे आहे. या आरक्षणासाठी जनगणनेची नाही तर एम्पिरीकल डेटाची गरज होती. न्यायालयाने दि.१३/१२/२०१९ ला एम्पिरीकल डाटा जमा करायला सांगितला होता. ते ही या सरकारने जमा केलेली नाही. त्यामुळे ५०% आतील आरक्षण सुद्धा रद्द करण्यात आले.
दुसरीकडे सावरगांव बसस्थानक चौक येथे जि प चे माञी शिक्षण सभापती उकेश चौव्हाण याच्या नेतृत्वात भाजपाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी धरणे आंदोलन व काही काळ चक्का जाम करून ओबीसी आरक्षण बहाल करण्याची मागणी केली. या प्रसंगी उकेश चौव्हान यांनी महाविकास आघाडीच्या निष्काळजीपणामुळे ओबीसीचे आरक्षण रद्द झाल्याचा आरोप केला. महाविकास आघाडी कोर्टात ओबीसीची भक्कमपणे बाजू माडण्यास कमी पडल्यामुळे आज ओबीसीचा हक्क हिरावल्या गेला आहे. जोपर्यंत ओबीसीना आरक्षण बहाल होत नाही तोपर्यंत राज्यातील जि प व प स च्या निवडणुका रद्द करण्याची मागणी करण्यात आली. या वेळी तालुका अध्यक्ष सुनिल कोरडे, शहर अध्यक्ष संजय कामडे,मनोज कोरडे,युवा मोर्चा जिल्हाउपाध्यक्ष मयुर दंढारे,कार्याध्यक्ष अक्षय विरखडे, रवि माळोदे, दिनेश पांडे,सुनील चुऱ्हे,तालुका अध्यक्ष युवा स्वप्नील नागपुरे,अंकुश घावडेश्रीकांत मालधुरे,निलेश हटेकर,चेतन ठोबरे,निखिल कठाणे, धनराज खोडे, मनिष दुर्गे, प्रशांत खुरसंगे, राहुल चौव्हान, महामंत्री दिलेश ठाकरे, सुरेश गुडधे, सुरेश बारई, लेखराज बादंरे , प्रफुल गजबे पंकज ढोणे महीला आघाडीच्या कांता चाफले,शंकुन चाफले, निता बरडे, शांता वाघमारे, ललीता खोडे, पार्वती काळबांडे, पुष्पा चाफले याच्यासह मोठ्या संख्येने पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Check Also

*उपाध्यक्ष बने राजु घुगल* *डॉ. विजय धोटे व मंदार मंगळे स्विकु्त नगरसेवक* *नगराध्यक्षा व नगरउपाध्यक्ष ने बनाया इतिहास*

🔊 Listen to this *उपाध्यक्ष बने राजु घुगल* *डॉ. विजय धोटे व मंदार मंगळे स्विकु्त …