*कामठी येथे तहसील कार्यालय समोर भाजपा पदाधिकार्यांनी केले चक्काजाम आंदोलन*

*राज्य सरकार विरोधात जोरदार प्रदर्शन करुन ओबीसी आरक्षण लागू करण्याची मागणी केली*
कन्हान प्रतिनिधि – ॠषभ बावनकर
कामठी : – ओबीसी आरक्षण स्थनिक स्वराज्य संस्था निवडणुका मधील सुप्रिम कोर्टाने आरक्षण रद्द केल्या चा निर्णय केल्याने महाराष्ट्र सरकारने सेवानिवृत्त न्यायाधींश समिती नेमणुक तसेच सुप्रिम कोर्टात फेर विचार याचिका दाखल करावी या करिता भाजपा कामठी विधानसभा क्षेत्राच्या पदाधिकार्यांनी तहसील कार्यालय समोर चक्का जाम आंदोलन करून राज्य शासनाच्या विरोधात जोरदार प्रदर्शन करित ओबीसी ला आरक्षण लागु करण्याची मागणी करण्यात आली आहे.
ओबीसी समाजाचा आरक्षण सुप्रीम कोर्टाने रद्द केल्याचा निर्णय दिला आहे त्यामुळे ओबीसी समाजातील बंधु व भगीनीवर स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुक मध्ये ओबीसी आरक्षण मधुन निवडणुक लढवता येणार नाही. त्यामुळे फारच मोठा अन्याय झाला आहे. महाराष्ट्र सरकारने लवकरच सुप्रिम कोर्टात फेरविचार याचिका दाखल करावी. तसेच सेवानिवृत्त न्यायाधिंशाची समिती नेमणुक करण्यात यावी आणि ओबीसी समाजावर होत असलेल्या अन्याय त्वरीत दुर करण्याच्या मागणी करिता शनिवार (दि.२६) जुन ला भाजपा महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष श्री चंन्द्रकांत दादा पाटील, सरचिटणीस चंन्द्रशेखर बावनकुळे यांच्या आदेशानुसार संपुर्ण महाराष्ट्रात राज्यव्यापी चक्काजाम आंदोलनाचे
आयोजनाने कामठी विधानसभा क्षेत्रात भाजपा पदाधिकार्यांनी माजी जिल्हा परिषद सदस्य अनिल निधान , शहर अध्यक्ष संजय कनोजिया , किशोर बेले यांच्या नेतृत्वात तहसील कार्यालय समोर चक्काजाम आंदोलन करून महाविकास आघाडी सरकारच्या विरोधात जोरदार प्रदर्शन करित तात्काळ ओबीसी ला आरक्षण लागु करण्याची मागणी केली आहे. या आंदोलनात महादुला नगरपंचायत अध्यक्ष राजेश रंगारी , कामठी पंचायत सभापति उमेश रड़के , येरखेडा ग्रामपंचायत सरपंच मंगला करेमोरे ,पंकज वर्मा , सुनील खानवानी , रमेश वैद्ध , मंगेश यादव , कपिल गायधने ,लालू यादव , विजय कोंदुलवार , गोपाल सीरिया , हर्षद अढ़ाऊ , प्रतीक पडोले , कुणाल सोलंकी , किरण राउत , सह मोठ्या संख्येत भाजपा पदाधिकारी उपस्थित होते .
Maharashtra News Media सच की आवाज