*अंबाझरी जैवविविधता उद्यानात पर्यावरणप्रेमींच्या सहकार्यातून स्वछता अभियान*
नागपुर उपजिल्हा प्रतिनिधी – दिलीप येवले
नागपुर:- निसर्गाने ओढवलेल्या विद्रूपीकरणाचा कळस झाला तर जीर्णोद्धाराचे युग सुरू होत, असे म्हणतात. निसर्गाने वेळोवेळी मानवाच्या कुवतीची परिसीमा वेळोवेळी दाखवून दिलेली आहे, मात्र आम्हाला काहितरी मोठं अन तितकेच टोकाचं काहीतरी झाल्याशिवाय काय करायचंच नसतं ( उदाहरणार्थ कोरोना आजारचंच घ्या ना ). ज्या देशात ,समाजात, निसर्गात, आपण वावरतो, राहतो, मोठे होतो आणि एके दिवस आपलीच माती होणार आहेत या सगळ्यांचे आपण काहितरी देणे लागतो.

एका रेणूत विश्व उध्वस्त करण्याची ताकद असते. मग आपण जिवंत माणसे आहोत, आपल्या डोळ्यादेखत जर काही गैर, आक्षेपार्ह, निसर्गाला व परिणामी मानवाला हानीकारक ठरणाऱ्या गोष्टीं घडत असतील तर सरकार किंवा इतर कुणावर त्याचं खापर फोडून मोकळं होणे, मला काय त्याचं, अश्या मनोवृत्तीचे प्रतिनिधित्व करनं योग्य नाहीच. गेल्या आठवड्यात अंबाझरी येथील जैवविविधता उद्यानाला भेट दिली. भटकंती दरम्यान नागनदी ( जो MIDC तील कारखान्याच्या सयुक्तिक विद्यामानाने नाल्यात रुपांतर झालय). दमदार पावसाने पुर भरून वाहतो. वाहत्या पाण्यासोबत आलेल्या प्लास्टिक कचऱ्याचा ढिग जमा होऊन वाहत्या पाण्याची कोंडी झालेली. वाहणारे पाणी पुढे जाऊन अंबाझरी तलावात जातं आणि सोबतच घेउन जाणारे प्लास्टिक कचरा सरळ तलावात हे चित्र अतिशय विदारक आहे. नुकतेच शासनाच्या वतीने व मा. आयुक्त श्री. तुकाराम मुंडे यांच्या कृतिशील आणि ध्येयवादी नेतृत्वाखाली नागनदीचा कधी नव्हे तो कायापालट झालाय आणि तोही अगदी कमी खर्चात हे कौतुकास्पद आहे. मात्र या ठिकाणी सुध्दा शासनाने यावर काही अंशी पावले नक्कीच उचलले असून हे कार्य प्रगतीपथावर आहे. या उपक्रमाचे कौतुक करायलाच हव मात्र जरा त्याला अवकाश आहे. या कचऱ्याची विल्हेवाट लावावी या उदात्त हेतूने नागपूर जिल्ह्याचे मानद वन्यजीव रक्षक श्री. अजिंक्य भटकर यांच्या पुढाकाराने आज या परिसरातील जमेल तितका प्लास्टिक कचरा साफ करून अंबाझरी तलावात वाहून जाणाऱ्या कचऱ्याची विल्हेवाट लावण्याचे ठरलं होत. आज जवळजवळ २०-२१ पोती भरून निघनारा कचरा तलावाचं, त्यातील जिवांचं , विदेशातून येणाऱ्या पक्ष्यांनसाठी घातक ठरू शकतो याची अनुभूती घेत आजच्या दिवसाच्या चिमूटभर केलेल्या कामाचं समाधान नक्कीच आहे. हे काम यशस्वी करणाऱ्या वनविभागाचे अधिकारी, किल्लेदार प्रतिष्ठान, आम्ही मराठी वाद्य पथक व इतर सहकारी मित्राच्या राबनाऱ्या हातांमुळे शक्य झालंय. हा छोटासा उपक्रम नागपूर वन विभागाचे सहायक वन संरक्षक सुरेंद्र काळे, वन परिक्षेत्र अधिकारी श्री आशिष निनावे, वनपाल प्रविण बडोले यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच वनरक्षक आरती भाकरे, निलेश टवले, विलास खापर्डे, आशिष कोहळे (PFA युनिट-2), स्वप्नील बोधाने, दिलीप येवले, निलेश रामटेके, अनिकेत इंगळे, विशाल देवकर (किल्लेदार प्रतिष्ठान नागपूर), दीपेश, जीवन, राकेश, अविनाश पराते, आनंद भंडारी, यश आणि इतर कर्मचाऱ्यांच्या सहकार्याने यशस्वीरित्या पार पडला.
अंबाझरीत येणार्या पर्यटकांनी परिसरात कचरा होऊ नये याची काळजी घ्यावी तसेच वनविभागाने केलेल्या सुचनाचे पालन करावे असे आव्हान श्री. अजिंक्य भटकर (मानद वन्यजीव रक्षक नागपूर) यांनी केले.
Maharashtra News Media सच की आवाज