Breaking News

*निमखेडा येथे प्रहार संघटनेतर्फे ठिय्या आंदोलन ; वीज प्रवाह बंद केल्याने शेतकरी त्रस्त*

*निमखेडा येथे प्रहार संघटनेतर्फे ठिय्या आंदोलन ; वीज प्रवाह बंद केल्याने शेतकरी त्रस्त*

 

रामटेक प्रतिनिधी :-पंकज चौधरी

रामटेक –  तारसा, निमखेडा, रेवराल, धनी, विरसी, भेंडाला, बानोर, पारडी, खापरखेडा, शिवाजी नगर सह या परिसरातील अनेक गावात वारंवार वीज पुरवठा खंडित होणे, ग्राम पंचायत तर्फे वीज बिल न भरल्याने त्यांचा गावांतील पथदिवे तसेच पाणी पुरवठा योजनांच्या विद्युत कनेक्शन कापल्याने एकीकडे अनेक गावात नागरिकांना पिण्याचा पाण्याचा त्रास सहन करावा लागत आहे
तर ऐन पावसाळ्याचा दिवसात गावांतील पथदिवे लाईन कापली असल्याने बंद असल्यामुळे गावं अंधारात चाचपडत आहे.

तर अनेक शेतकऱ्यांचे कृषि पंपाचे अवाजवी व सरासरी बिल पाठविले व बिल न भरल्यास कृषी पंप डीपी पासूनच बंद केले अनेक शेतकऱ्यांचे शेतात इलेक्ट्रिक पोल व तार वादळ आले म्हणून अनेक दिवसा पासून पडलेले आहेत मात्र ते अजूनही दुरुस्त करण्यात आले नाही अश्या अनेक समस्या होत्या.

त्यावर आज या भागातील प्रहार शाखेन तर्फे प्रहार नागपूर जिल्हा प्रमुख रमेश कारामोरे यांच्या नेतृत्वाखाली निमखेडा येथील धनी रोड वरील एम एस इ बी च्या सब स्टेशन वर प्रहार तर्फे ठीय्या आंदोलन करण्यात आले.

तब्बल 4 तास प्रहार च्या कार्यकर्त्यांनी सब स्टेशन चे गेट वर बसून ठिय्या मांडला अखेर उपविभागीय अभियंता श्री वैद्य व कनिष्ठ अभियंता श्री सोंनटक्के व अधिकारी हे आंदोलन स्थळी आले व 8 दिवसांत सर्व समस्या मार्गी लावण्याचे आश्वासन देत ठिय्या आंदोलन संपविण्याची विनंति केली.

त्यावर एम. ई. सी.बी . ला 8 दिवसाचा वेळ देऊन या समस्या 8दिवसांत न सुटल्यास पुन्हा आंदोलन करण्याचा इशारा रमेश कारामोरे यांनी उपस्थीत अधिकारी यांना दिला.

यावेळी प्रहार मौदा तालुका प्रमुख नाना ठाकरे, शुभम मेहर, अमित हटवार , दत्तुजी मदनकर, निखिल श्रावणकर, प्रयास ठवरे, निलेश भोले, टिकेशवर सपाटे, नीळकंठ भोयर, प्रफुल जुमले, निलेश शेंडे, गौरीशंकर कारामोरे सह अनेक प्रहार चे कार्यकर्ते उपस्थीत होते.

Check Also

*उपाध्यक्ष बने राजु घुगल* *डॉ. विजय धोटे व मंदार मंगळे स्विकु्त नगरसेवक* *नगराध्यक्षा व नगरउपाध्यक्ष ने बनाया इतिहास*

🔊 Listen to this *उपाध्यक्ष बने राजु घुगल* *डॉ. विजय धोटे व मंदार मंगळे स्विकु्त …