*प्रत्येक व्यक्तीने वृक्षारोपण करणे पर्यावरणाच्या सुरक्षेसाठी आवश्यक :डॉ.शरयू तायवाडे*
नागपुर उपजिल्हा प्रतिनिधी -दिलीप येवले
नागपुर:- आपले जीवन जगण्यासाठी प्रत्येक प्राणीमात्राला प्राणवायूची गरज असते.आणि शूध्द प्राणवायू प्राणीमात्रांना वृक्षांपासून प्राप्त होत असतो.आज ठिकठिकाणी विकासाच्या नावावर जंगलतोड सुरू आहे,तसेच वेगवेगळ्या नैसर्गिक आपत्तीमुळे प्राणीमात्रांना जीवन जगणे कठीण झाले आहे. आज व्यक्तीला प्राणवायु म्हणून अॉक्सिजन विकत घ्यावे लागते. आज मनूष्यप्राणीसूध्दा महत्वाचा आहे. ओसाड भागात व आपल्या आजूबाजूच्या परिसरात वृक्षारोपण करून पर्यावरणाला वाचविणे आवश्यक झाले आहे.म्हनूण प्रत्येक व्यक्तीने आपली अत्यावश्यक गरज समजून वृक्षारोपण करावे,असे मत तायवाडे कॉलेजच्या प्राचार्य डॉ.शरयू तायवाडे यांनी व्यक्त केले.

तायवाडे महाविद्यालय महादूला-कोराडी येथील राष्ट्रीय सेवा योजना , वनस्पतीशास्त्र विभाग व राज्यशास्त्र विभागाच्या वतीने महाविद्यालय परिसरात आषाढी एकादशीच्या निमित्ताने वृक्षारोपण कार्यक्रम घेण्यात आला.या कार्यक्रमात अध्यक्ष म्हणून तायवाडे महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ.शरयू तायवाडे उपस्थित होत्या,त्यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले.या कार्यक्रमाला संगनकशास्त्र विभागप्रमुख डॉ.गिरीष काटकर ,सूक्ष्मजिवशास्त्र विभागप्रमुख डॉ.विजय चरडे,व वाणिज्य विभागप्रमुख डॉ.अशोक धोटे उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे संचालन राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी डॉ.कीशोर घोरमाडे यांनी तर आभार वनस्पतीशास्त्र विभागप्रमुख डॉ.सुवर्णा पाटील यांनी केले.या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी राज्यशास्त्र विभागप्रमुख डॉ.वकील शेख ,श्री.राजु वालुंद्रे व श्री.भास्कर गाते यांनी परिश्रम घेतले.
Maharashtra News Media सच की आवाज