*विज्ञानाच्या विद्यार्थ्याने मराठी भाषेचे व्यवहारज्ञान प्राप्त करावे – डॉ.शरयू तायवाडे*

विशेष प्रतिनिधि – दिलीप येवले
कोराडी – तायवाडे महाविद्यालय महादूला- कोराड, एम बी.पटेल कला , वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय , साकोली आणि जगत कला , वाणिज्य व इंदिराबेन हरिहरभाई पटेल विज्ञान महाविद्यालय , गोरेगाव यांच्या संयुक्त विद्यमाने विज्ञान स्नातक भाग एकच्या मराठी विषयाच्या विद्यार्थ्यासाठी सत्र दोनच्या अभ्यासक्रमावर आधारित *साहित्यसेतू : आकलन , आस्वाद व चिकित्सा* ही तीन दिवसीय आभासी कार्यशाळा बुधवार दिनांक २८ जुलै २०२१ ते ३० जुलै २०२१ पर्यंत आयोजित करण्यात आली . या कार्यशाळेचे उद् घाटन राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठातील परीक्षा व मूल्यमापन विभागाचे संचालक डॉ . प्रफुल्ल साबळे ह्यांच्या हस्ते करण्यात आले . त्यांनी विज्ञान शाखेतील विद्यार्थ्यासाठी असणारी मराठी भाषेची उपयुक्तता पटवून दिली . तसेच काळानुरूप ग्लोबल होउन ज्ञानवंतांचा उपयोग विद्यार्थ्यांना करून देणे काळाची गरज असल्याचे प्रतिपादन केले . कार्यशाळेच्या अध्यक्षस्थानी तायवाडे महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ . शरयू तायवाडे या होत्या . त्यांनी प्राचीन अर्वाचीन साहित्याच्या आकलन आस्वादाने विद्यार्थ्यांची संवेदनक्षमता जागृत रहावी , त्यांचा जीवनविषयक दृष्टिकोण अधिक प्रगल्भ व्हावा , विज्ञानाच्या विद्यार्थ्याला भाषेचे व्यवहारज्ञान प्राप्त व्हावे यासाठी मराठी भाषेचा अभ्यास तीनही वर्षे अनीवार्य असल्याचे स्पष्ट केले . याप्रसंगी विद्यापीठाच्या विज्ञान व तंत्रज्ञान विद्याशाखेच्या भाषा अभ्यासमंडळाचे अध्यक्ष डॉ . कार्तिक पनीक्कर यांनी विद्यार्थ्यांचा भाषाविषयक व वैज्ञानिक दृष्टिकोण प्रगल्भ होउन त्यांच्यात मूल्य रूजविण्यासाठी या अस्वस्थ वर्तमानात प्रस्तुत कार्यशाळेचे आयोजन ही महनीय बाब असल्याचे प्रकट केले . या कार्यशाळेच्या उपयुक्ततेबद्दल प्रशंसनीय गौरवोद्गार काढून एम.बी.पटेल महाविद्यालय , साकोली येथील प्राचार्य डॉ . एच.आर त्रिवेदी व जगत महाविद्यालय , गोरेगाव येथील प्राचार्य डॉ . निळकंठ लजे यांनी शुभेच्छा दिल्यात . त्यानंतर पहिल्या सत्रात सेठ नरसिंगदास मोर एन.मोर कला , वाणिज्य व श्रीमती गोदावरीदेवी सराफ विज्ञान महाविद्यालय तुमसर येथील मराठी विभागातील प्रा . रेणुकादास उबाळे यांनी साहित्यसेतू या पाठयपुस्तकातील पाठावर आपले मूलभूत आकलन मांडले . विद्यार्थ्यांना पाच पाठाचे अंतरंग उलगडून देताना त्यांनी संत गाडगेबाबा , बाबा आमटे यांच्या कार्यकर्तृत्वाचा मार्मिक आढावा घेतला . एक राष्ट्र एक जनता हा डॉ . वि.भि.कोलते व वैज्ञानिक दृष्टिकोण म्हणचे काय ? हा जयंत नारळीकरांच्या पाठाचे वस्तुनिष्ठ चिंतन मांडले व वसंत वराडपांडे यांच्या कथेचा प्रेरक रसास्वाद विद्यार्थ्यांना दिला , त्यानंतर दुसऱ्या दिवशीच्या सत्रात याच पुस्तकातील पाच कवितेवरील रसग्रहण व अर्थ आकलन व चिकित्सा शिवप्रसाद सदानंद जयस्वाल कॉलेज , अर्जुनी मोरगाव येथील प्रा . डॉ . शरद मेश्राम यांनी अतिशय समर्पकतेने केली . या कार्यशाळेचा समारोप शिवाजी विद्यापीठ , कोल्हापूर येथील मराठी विभागातील प्रा . डॉ . नंदकुमार मोरे यांच्या व्यावहारिक मराठी या घटकातील अनुवादप्रकिया या विषयावरील अभ्यासपूर्ण भाषणाने झाला . अनुवाद ही सर्जनशील प्रकिया कशी आहे , त्यासाठी वाचन ही अपरिहार्य अट कशी आहे , त्याबरोबरच इतर भाषा येणे व इतर देशाच्या संस्कृतीचे ज्ञान असणे ही उत्तम अनुवादकासाठीची लक्षणे किती महत्वाची आहेत हे त्यांनी सोदाहरण पटवून दिले . समारोपीय अध्यक्षीय भाष्य करताना प्राचार्य डॉ . शरयू तायवाडे यांनी व्यावहारिक मराठीची उपयुक्तता पटवून दिली . या संपूर्ण कार्यशाळेचे समन्वयन प्रा.डॉ. कोमल ठाकरे , प्रा . डॉ . राजेंद्र वाटाणे , प्रा डॉ . शंकर बागडे , प्रा.डॉ. चंद्रकुमार राहुले व प्रा.डॉ. चैनलाल राणे यांनी केले . या कार्यशाळेला तिन्ही महाविद्यालयातील प्राध्यापक व विद्यार्थी ऑनलाईन उपस्थित होते . या कार्यशाळेला युटयुबवरून विद्यापीठ संलग्नित सर्व महाविद्यालयातील विज्ञान शाखेतील मराठी विषयाचे विद्यार्थी उपस्थित होते . कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरिता डॉ . चंद्रकांत भास्कर , डॉ . अजय रामटेके व डॉ वकील शेख यांनी सहकार्य केले .
Maharashtra News Media सच की आवाज