Breaking News

*औष्णिक विघुत केंन्द्राच्या कर्मचा-यांचे संप पुढे ढकला*

*औष्णिक विघुत केंन्द्राच्या कर्मचा-यांचे संप पुढे ढकला*


नागपुर उपजिल्हा प्रतिनिधी दिलीप येवले

नागपुर:- केंद्र सरकारचे प्रस्तावित विद्युत विधेयक सुधारणा बिल २०२१ च्या विरोधात विद्युत क्षेत्रात राष्ट्रीय पातळीवर काम करणाऱ्या विद्युत कर्मचारी आणि अभियंत्यांच्या राष्ट्रीय समन्वय समितीने ( एनसीसीओईईई ) आज दिनांक 10 ऑगस्ट 2021 रोजी संप पुकारलेला होता. या संपाला साद देत महाराष्ट्रातील सर्व संघटनांनी 24 जुलै 2021 ला प्रस्तावित संपाची नोटीस बजावली होती. संपूर्ण महाराष्ट्रात संपाची तयारी बघून केंद्राच्या सरकारने संपाचा धसका घेऊन व त्याचा वीजनिर्मिती वर होणारा परिणाम लक्षात घेऊन राष्ट्रीय समन्वय समिती ( एनसीसीओईईई ) सोबत तातडीची बैठक केंद्रीय ऊर्जामंत्री मा. ना. आर के सिंह घेतली. केंद्रीय ऊर्जामंत्री मा. ना. आर के सिंह यांच्याशी झालेल्या चर्चे नंतर विद्युत कर्मचारी आणि अभियंत्यांच्या राष्ट्रीय समन्वय समितीने ( एनसीसीओईईई ) पुकारलेला वीज कर्मचारी आणि अभियंत्यांचा दिनांक १० आॕगष्टचा देशव्यापी संप तुर्तास पुढे ढकलला आहे. जर केंद्र सरकारकडून चालू अधिवेशनात संसदेसमोर विधेयक मांडण्याचा कोणताही एकतर्फी प्रयत्न केला गेला तर वीज कर्मचारी त्याच दिवशी लाईटनिंग संपाचा अवलंब करतील असा इशारा राष्ट्रीय समन्वय समितीने कडून देण्यात आला आहे.
वरील प्रस्तावित संप व निदर्शनाचा एक भाग म्हणून महाराष्ट्रातील सर्व विद्युत केंद्राच्या मुख्य द्वारावर वीज कर्मचारी अभियंते व अधिकारी संघटनेची राज्यस्तरीय संघर्ष समितीने आज दिनांक 10 ऑगस्ट 2021 रोजी द्वार सभेचे आयोजन केले होते. या प्रसंगी ग्रॅज्युएट इंजिनिअर्स संघटने तर्फे नाशिक येथे केंद्रीय सरचिटणीस सुयोग झुटे, चंद्रपूर येथे नवल दामले, कोराडी येथे विशाल मुल्लेवार, खापरखेडा येथे स्वप्नील पाटील, उरण येथे केंद्रीय कार्याध्यक्ष सुप्रीत शिंदे यांनी प्रस्तावित विद्युत कायदाचे कर्मचारी, शेतकरी, देश व सामान्य माणसावर होणारा परिणाम उपस्थिताना समजवून सांगितला. कोराडी येथे राज्यस्तरीय संघर्ष समिती यांच्यातर्फे व म.रा.मा. कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष हर्षद खंडारे, म.रा. ता. संघटनेचे तांत्रिक संघटनेचे राजेश गोरले यांनी द्वार सभेला संबोधित केले.

Check Also

*उपाध्यक्ष बने राजु घुगल* *डॉ. विजय धोटे व मंदार मंगळे स्विकु्त नगरसेवक* *नगराध्यक्षा व नगरउपाध्यक्ष ने बनाया इतिहास*

🔊 Listen to this *उपाध्यक्ष बने राजु घुगल* *डॉ. विजय धोटे व मंदार मंगळे स्विकु्त …