Breaking News

*नागपुरकर सैनिकांना राख्या पाठवून दिल्या दीर्घायुष्याच्या शुभेच्छा*

*नागपुरकर सैनिकांना राख्या पाठवून दिल्या दीर्घायुष्याच्या शुभेच्छा*

नागपुर उपजिल्हा प्रतिनिधी दिलीप येवले
नागपुर:- मागील १५ वर्षापासून नागपूरकरांनी देशाच्या सिमेवर रक्षण करणाऱ्या सैनिक बांधवांसाठी स्वतः राख्या बनवून सैनिकांना राख्या पाठवून दीर्घाआयुष्याच्या शुभेच्छा दिल्या. या उपक्रमासाठी नागपूरकरांचे संयोजक निखिल भुते व कार्याध्यक्ष विक्रांत चिलाटे यांच्या पुढाकाराने नागपुरातील सामाजिक, आध्यात्मिक, महाविद्यालयीन सांस्कृतिक क्रीडा व सैनिकी संघटनाच्या संकल्पनेतून भारत-पाकिस्तान कारगील (बॉर्डर) वरील सैनिकांनसाठी नागपूरकरांच्या वतीने नागपुर चे श्रीमंत राजे जयसिंग भोसले यांच्या प्रमुख उपस्थित व विविध मान्यवरांच्या हस्ते नागपूरचे जिल्हाधिकारी आर. विमला यांच्या माध्यमातून बॉर्डर वर राख्या पाठविण्यात आल्या. डॉ. बबनराव तायवाडे अध्यक्ष सचिदानंद शिक्षण संस्था यांच्या मार्गदर्शनात कार्यक्रम राबविण्यात आला.
याप्रसंगी तायवाडे कॉलेज ऑफ फार्मसी व तायवाडे इन्स्टिट्यूट ऑफ डिप्लोमा इन फार्मसी च्या वतीने डॉ. चंद्रशेखर डोईफोडे, प्राचार्य विक्रांत चिलाटे, व कमलेश माचेवार उपस्थित होते. विदर्भ फार्मसी असोसिएशनचे अभिजीत दरवडे व मिसेस नागपूर प्रविण दांडे, प्रा.अश्विनी भुते व इंडियन फार्मसी ग्रॅज्युएट असोसिएशनचे मोहनीश जुनघरे व आकांशा सडमाके, आचल मेश्राम, ऋषी आठवले, ज्ञानेश्वर पाटील व इतर विद्यार्थी उपस्थित होते.
निखिल भुते लोकसेवा प्रतिष्ठान चे पंकज बांते, भावना चौधरी व माजी सैनिक मोहन वैरागडे व विविध संघटनेचे प्रमुख उपस्थित होते.
यावेळी नागपूरकरान तर्फे अश्विनी भुते यांनी जिल्हाधिकारी आर विमला व उपजिल्हाधिकारी जगदीश काटकर यांना राखी बांधली.

Check Also

*सावनेर शेगाव बस सुरु* *नगराध्यक्षा संजना मंगळे यांनी दाखवली हिरवी झंडी*

🔊 Listen to this *सावनेर शेगाव बस सुरु* *नगराध्यक्षा संजना मंगळे यांनी दाखवली हिरवी झंडी* …