*बिकेसीपी शाळेने कोरोना कालावधीतील फी माफ करावे*

*ग्रामोन्नती प्रतिष्ठान व्दारे शिक्षण उपसंचालक श्रीमती जामदार यांना निवेदन*
कन्हान प्रतिनिधि – ॠषभ बावनकर
कन्हान : – बिकेसीपी शाळेने कोरोना काळात शाळा बंद असतांना विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षण न देता पालकांना वारंवार तगादा लावुन सक्तीने फी वसुल करीत आहे. शाळा बंद असतांना केवळ फी भरली नाही या एकमेव कारणामुळे यंदाच्या शैक्षणिक वर्षात विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षणापासुन वंचित ठेवणाऱ्या बिकेसीपी शाळेवर कारवाई करून कोरोना कालावधीतील शाळेची फी माफ करून पालकांना दिलासा द्यावा अशी मागणी ग्रामोन्नती प्रतिष्ठानचे अध्यक्ष व माजी खासदार प्रकाश जाधव यांनी शिक्षण उपसंचालक डॉ वैशाली जामदार यांना भेटुन व चर्चा करुन तसेच एक निवेदन देऊन करण्यात आली आहे .
बीकेसीपी स्कुल कन्हान येथे नर्सरी ते १० पर्यंत विद्यार्थी शिकत आहे. कोरोनामुळे मार्च २०२० पासुन शाळा बंद असतांना विद्यार्थ्याचे शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणुन आपातकाळ परिस्थितीत शाळेने कुठलेही शिक्षण शुल्क न घेता विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षण दिले पाहीजे. असे शासनाचे धोरण असतांना १) बीकेसीपी शाळेने मार्च २०२० ते जुन २०२१ पर्यंत नर्सरी, १ ली ते १० वी च्या विद्यार्थ्यांचा वाटसअप ब्रॉड कास्ट ग्रुप बनवुन मागील वर्षीच्या विद्यार्थ्यांच्या नोट चे फोटो पाठवुन ते वहीत लिहिण्यास सांगितले.विद्यार्थ्यांना येणाऱ्या अडचणींचा काहीच विचार केला नाही, फोन केल्यास फोन उचलला नसल्याने विद्यार्थ्यांच्या समस्यांचे निराकरण झाले नाही. २) महाराष्ट्र शासन शिक्षण विभागाने २०२०-२०२१ सत्राकरिता २५ % कमी केलेला अभ्यासक्रम शाळेने कमी न करता संपुर्ण अभ्यास क्रमावर लिहिण्याचे काम शाळे व्दारे विद्यार्थ्यांना पाठवुन दिशाभुल केली. ३) शाळेत इयत्ता १ ते ४ ला मराठी विषय सक्तीचा असुन सुध्दा शिकविला जात नाही. परंतु ५ वी च्या बढती विद्यार्थ्यांचा मराठी पेपर कसा घेण्यात आला. ४) पेपर विद्यार्थ्यांना घरी सोडवुन पालकांनी शाळेत जमा करण्यास बोलावुन उत्तरपत्रिका फी भरल्याशिवाय घेणार नाही, अशी दमदाटी केली. ५) पुर्ण फी भरल्या शिवाय विद्यार्थ्यांना वरच्या वर्गात बढती नाही, ऑनलाईन शिकविल्या जाणार नाही, बोनाफाईड, मार्क लिस्ट, टी सी मिळणार नाही. अश्या अनेक प्रकारे विद्यार्थी व पालकांना दम दाटी करून फी वसुलण्याचा गोरखधंदा करीत आहे. ६) धर्माध नोंदणी कृत संस्थे व्दारे शाळा संचालित असतांना शाळने नर्सरी ते इयत्ता ८ वी पर्यंत विद्यार्थ्यांना प्रवेश देतांना प्रत्येक पालकांकडुन २ ते ७ हजार रू सुरक्षित ठेवी (सेक्युरेटी डिपाझीट) कोणत्या कायद्यांतर्गत घेत आहे. तसेच पालकांची सुरक्षित ठेवी १० ते १३ वर्षांनी म्हणजे १० वी पास झाल्यावर शाळा सोडतांना व्याजासह परत न करता, फक्त मुद्दलच पावती असेल तरच परत करते, नसेल तर परत करुत नाही का ? ७) विद्यार्थ्यांना ऑनलाईन लॉईव्ह शिक्षण न देता फक्त विद्यार्थ्यांचे शिक्षणाचे नुकसान करून पालकांना शाळेची फी भरण्यास वारंवार तगादा लावुन सक्ती ने फी वसुल करित आहे.
बीकेसीपी स्कुल कन्हान ने मार्च २०२० पासुन शाळा बंद असतांना विद्यार्थी शाळेत गेलेच नाही तरी शिक्षण शुल्क, लॉयबरी फी, जिमखाना, खेळ फी, परीक्षा फी, इनव्हेटरचे २०० रूपए सह दरवर्षी ५६० रुपए ऍक्टिव्हिटी फी ऑगस्ट व नोव्हेंबर या दोन महिन्यात ११२० रूपए घेतल्या जाते. ती यावर्षी टर्म फी च्या नावाने घेत आहे. सत्र २०२०-२०२१च्या विद्यार्थ्यांना ऑनलाई न लॉईव्ह शिक्षण न देता शिक्षणाचा गोरखधंद करून दिनांक.१ जुलैै २०२१ पासुन ऑनलाईन शिक्षण सुरू केले. मात्र दिनांक.३ ऑगस्ट २०२१ पासुन फी न भरल्या मुळे विद्यार्थ्यांचे ऑनलाईन लॉईव्ह शिक्षण शाळेने बंद केल्याने कोरोना काळात सर्व काम धंदे बंद असल्याने पालकांची आर्थिक परिस्थिती अंत्यत बिकट असतांना मनस्ताप देत अनेक समस्या, प्रश्न निर्माण केल्याने पालक भयंकर त्रस्त होऊन असंतोष उसळत असल्याने महोदया आपण विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक भवित्व्याचा जाणीव पुर्वक विचार करून समस्याचे योग्य निवारण करीत शाळा प्रशासनावर कठोर कारवाई करून कोरोना ने शाळा बंद ते शाळा सुरू होई पर्यंत शाळेने फी माफ करावी तसेच कोरोना काळात मुत्यु पावले ल्या पालकांच्या पाल्याची पुर्णत:च फी माफ करून पालक व विद्यार्थ्यांना न्याय देऊन दिलासा द्यावा . अशी मागणी ग्रामोन्नती प्रतिष्ठानचे अध्यक्ष व माजी खासदार प्रकाश जाधव यांनी शिक्षण उपसंचालक डॉ वैशाली जामदार यांना एक निवेदन देऊन करण्यात आली आहे . या प्रसंगी मोतीराम राहटे, कमलेश पांजरे, राजाभाऊ रामल्लेवार, अशोक खंडाईत, प्रविण जुमळे, दिवाकर इंगोले, सुनिल सरोदे, किशोर वासाडे सह आदि पालक वर्ग मोठ्या संख्येत प्रामुख्याने उपस्थित होते.
Maharashtra News Media सच की आवाज