Breaking News

*१४ ऑक्टोंबर स्विकारल्या शिवाय धम्म क्रांतीला विज्ञाननिष्ठता प्राप्त होणार नाही

*१४ ऑक्टोंबर स्विकारल्या शिवाय धम्म क्रांतीला विज्ञाननिष्ठता प्राप्त होणार नाहीअॅड. मुकुंद खैरे

आवारपूर प्रतिनिधि – गौतम धोटे 

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी १४ ऑक्टोबर १९५६ रोजी एतिहासहिक धर्मांतर घडवून आणले. बौद्ध धम्माची दीक्षा घेतली. बाबासाहेबांनी कुठेही आपण धम्मचक्र प्रवर्तन करीत आहोत असे म्हटले नाही. धम्मचक्र प्रवर्तन तथागत बुद्धांनी केले ते बौद्ध धर्माचे संस्थापक होते. बाबासाहेबांनी बुद्धाचा धम्म स्वीकारला. गेल्या ६३ वर्षापासून दसऱ्याच्या तिथीवर दीक्षाभूमीवर धम्मचक्र प्रवर्तन महोत्सव साजरा होत आहे पण खऱ्या अर्थाने १४ ऑक्टोंबर हाच धम्मदीक्षा दिन असल्याने आंबेडकरी, बौद्ध जनतेची विज्ञाननिष्ठ विचारांची परंपरा निर्माण करण्यासाठी १४ ऑक्टोबर या तारखेवरच धम्मदिक्षा दिन साजरा करावा असे आवाहन दीक्षाभूमीवर १४ ऑक्टोंबर ची परंपरा निर्माण करणारे समाज क्रांती आघाडी व एक्शन कमिटी फॉर बुद्धिष्ट लाॅ चे अध्यक्ष अॅड.मुकुंद खैरे यांनी संविधान चौकात आयोजिलेल्या धम्म संदेश रॅलीमध्ये बोलतांना केले.
अॅड. खैरे यांनी पुढे सांगितले की, पंधरा वर्षांपूर्वी १४ ऑक्टोबरला दीक्षाभूमी चे प्रवेशद्वार बंद असायचे. आपण “दसरा छोडो १४ ऑक्टोंबर का स्वीकार करो” असा नारा देत दीक्षाभूमी जनतेसाठी खुली केली. आपल्या वर आंदोलनादरम्यान दीक्षाभूमी स्मारक समितीने २००६ व २०१२ मध्ये गुन्हे दाखल केले होते. परंतु बाबासाहेबांचा विज्ञाननिष्ठ विचार रुजविण्यासाठी आपण काहीही न घाबरता १४ ऑक्टोबर चे आंदोलन सुरू ठेवले. त्याची आज प्रचिती दीक्षाभूमीवर १४ ऑक्टोबरला चार ते पाच लाख लोक एकत्र येत आहे. आंबेडकरी बौद्ध जनतेनी काही प्रमानात का होईना १४ ऑक्टोबर चे परिवर्तन स्वीकारले या बद्दल आपण जनतेचे आभार मानतो. परंतु दसऱ्याची परंपरा पूर्णता मोडीत निघायला पाहीजे,असे आग्रही प्रतिपादन अॅड. खैरे यांनी यावेळी केले.
सुरुवातीला पूज्य भदंत आनंद व भन्ते कमालधम्मो यांनी पंचशील व बुद्ध वंदना घेतली. दया सागर बौध्द, प्रा.अशोक वानखडे,चंद्रमनी सहारे यांनी यांनी मार्गदर्शन केले. सभेचे प्रास्ताविक सुनील जांभुळकर यांनी मांडले तर पुढे सुत्रसंचालन प्रदीप फुलझेले यांनी सांभाळले.कार्यक्रमाचे आभार सारथीकुमार सोनटक्के यांनी मानले. कार्यक्रमाचे यशस्वितेकरिता माणिक सूर्यवंशी, धनराज धोपटे, सुनील जांभुळकर, संगीता खोब्रागडे, चंद्रभागा पानतावणे, चांगो बोरकर, विक्रमादित्य वाघमारे, एल.टी. लव्हात्रे,अजय डंबारे,मधुकर मेश्राम, भिमराव नंदेश्वर इत्यादींनी परिश्रम घेतले.

Check Also

दुःखद निधन – श्रीमती.गिरजाबाई साहेबलालजी ढूँढेले (सावनेर ) इनका दुःखद निधन

🔊 Listen to this दुखद समाचार आप सभी को अत्यंत दुख साथ यह सुचित किया …