Breaking News

*कांन्द्री ते बोरडा रस्ता चौकात नागपुर बॉयपास चारपदरी महामार्गाचा उडाण पुल त्वरित बनविन्याची मागणी*

*कांन्द्री ते बोरडा रस्ता चौकात नागपुर बॉयपास चारपदरी महामार्गाचा उडाण पुल त्वरित बनविन्याची मागणी*

 

कन्हान प्रतिनिधि – ॠषभ बावनकर

कन्हान : – काश्मीर ते कन्याकुमारी ला जोडणारा नागपुर जबलपुर राष्ट्रीय महामार्ग नागपुर शहर बॉयपास चारपदरी महामार्गावरील कांन्द्री बोरडा रस्त्याचा चौक अपघात स्थळ होत असल्याने कांन्द्री बोरडा रोड वर चारपदरी महामार्गाचा उडाण पुल त्वरित बनविण्याची मागणी प्रोजेक्ट डायरेक्टर एनएचएआय, नागपुर यांना निवेदन देऊन जिल्हा परिषद गोंडेगाव-साटक सदस्य व विरोधी पक्ष उपगट नेता जिल्हा परिषद नागपुर मा व्यकटेश कारेमोरे यांनी केली आहे.
नागपुर-जबलपुर महामार्ग टेकाडी स्टाप पासुन भंडारा महामार्ग, उमरेड मार्ग, हैद्राबाद, वर्धा महामार्ग जोडणारा नागपुर शहर बॉयपास चारपदरी महामार्ग बनुन १० वर्ष होत असुन कांन्द्री-बोरडा-नगरधन-रामटेक ला जोडणारा राज्यमार्ग असुन अनेक गाव खेडया च्या लोकांचे दररोज ये-जा ची वर्दळ असते. कांन्द्री-बोरडा रस्त्याचा या महामार्गावर चौरस्ता असुन ३०० मीटर वर गोंडेगाव पुर्नवसन वस्ती आहे. २४ तास येथे बसे, स्कुल बसे, कार, ऑटो, शेतकऱ्यांचे टँक्टर, दुचाकी वाहनाची वर्दळ वाढली असल्याने आतापर्यंत वाहनाचे अपघात होऊन कित्येकांचे जीव गेले तर कित्येकाना अंपगत्वाचे बळी पडावे लागले आहे. या चौकातुन ५०० मीटर वर असलेल्या रेल्वे क्रॉसींग वर सन २००३-०४ मध्ये रेल्वे टँक्टर ट्राली अपघातात ५८ लोकांचा बळी गेला होता. अशीच मोठी दुर्घटना या चौकात होण्याची शक्यता नाकारता येत नसल्याने बोरडा-कांन्द्री चौकात बॉयपास चारपदरी महामार्गाचा उडाण पुल मंजुर करून त्वरित बनविण्याची मागणी मा. वेंकटेश कारेमोरे विरोधी पक्ष उपगट नेता जि. प. नागपुर यांच्या नेतृत्वात मा. एन.एल.येवतकर प्रोजेक्ट डायरेक्टर भारतीय राजमार्ग व महामार्ग भारत सरकार याना रामनगर नागपुर च्या कार्यालयात भेटुन व चर्चा करून करण्यात आली आहे. याप्रसंगी जयराम मेहरकु ळे सचिव भाजपा नागपुर जिल्हा, धर्मेन्द्र गणवीर प्रामुख्याने उपस्थित होते.

Check Also

*सुनील केदार यांनी मुस्लिम बांधवांना ईदच्या शुभेच्छा दीला*

🔊 Listen to this *सुनील केदार यांनी मुस्लिम बांधवांना ईदच्या शुभेच्छा दीला* मुख्य संपादक – …