*राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे शहर अध्यक्ष रत्नदीप मोटघरे यांनी दिला राजीनामा*
*अनंता झाडे यांनी पुन्हा भाजपला छुपा पाठिंबा देण्याचं ठरवलंच की काय?*
वर्धा प्रतिनिधि – पंकज रोकड़े
आर्वी – शहर राष्ट्रवादी काँग्रेसच्या रत्नदीप मोटघरे यांनी नुकताच राजीनामा दिला आहे. तसेच आपन राष्ट्रवादी चे नेते अनंता झाडे यांच्या मुळेच राजीनामा दिला आहे, असंच जर सुरू राहिले तर इथून समोर राष्ट्रवादी काँग्रेस येणाऱ्या नगरपालिका निवडणुकीत निस्तनाबूत झाल्या शिवाय राहणार नाही असे रत्नदीप यांनी आधीच स्पष्ट केले आहे.
वृषभ निस्ताने विधानसभा अध्यक्ष राष्ट्रवादी युवक काँग्रेस यांनी गेल्या वर्षी पासून रत्नदिप यांच्या वर आर्वी शहराची जबाबदारी दिली होती व यांच्या नेतृत्वात रत्नदिप आर्वी शहरात सात्यात्याने पक्ष बहुबळकट करीत होते त्यांच्या हा कामाची चर्चा सर्व शहरात होती जनसामान्य घरातील नवेनेतृत्व तयार होण्याचे चित्र दिसतं होत मात्र पक्षातील काही लोक पक्षासाठी नाहि तर भाजपा साठी काम करतात हे अनेक वेळा दिसून आले
राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अध्यक्ष रत्नदीप मोटघरे यांनी आपला राजीनामा राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अध्यक्ष वृषभ निस्ताने यांच्याकडे दिला आहे.
आपल्या राजीनामा पत्रात त्यांनी अनंता झाडे यांचे कारण दिले आहे, मात्र अजूनही त्यांचा राजीनामा स्विकारला गेला नाही
आर्वी विधानसभेत राष्ट्रवादी काँग्रेस पूर्ण पणे जमिनदस्त झाली होती परंतु त्याला राष्ट्रवादी युवक कॉग्रेस चे विधानसभा अध्यक्ष वृषभ निस्ताने यांनी संजीवनी देत पक्ष पुन्हा मोठा केला. पक्षाचे मोठे नेते भाजपा मधे गेल्यानंतर पक्षाला कुणाचाच आधार नसताना स्वबळावर वृषभ निस्ताने यांनी दिवस रात्र पक्षाचे सातत्याने काम करून विधानसभा मतदार संघात नवंसंजिविनी मिळून दिली तरी पक्ष त्याचं त्याचं व्यक्तीच्या विरोधात मीटिंग घेऊन त्यांना डावलण्याचा प्रयत्न करत राहते, वारंवार पक्षाच्या नेत्यांना खोट्या तक्रारी करीत राहाते म्हनून रत्नदिप मोटघरे यांनी राजीनाम्यानंतर व्यक्त केलें समोर राष्ट्रवादी काँग्रेसला चांगले भविष्य दिसत असतांना अनंत झाडे यांनी पुन्हा भाजप ला छुपा पाठिंबा देण्याचं ठरवलं आहे अनंता झाडे यांना पक्षातून काढण्यात यावे नाही तर माझ्या सोबत 70 कार्यकर्ते राजीनामे देतील, अनंत झाडे हे इतक्या दिवसापासून राष्ट्रवादी पक्षात असून त्यांनी पक्ष वाढीसाठी कोणते काम केले आणि आज मतदार संघात तरुण नेतृत्व वृषभ निस्ताने यांच्या स्वरूपात पक्षाला व मतदार संघाला मिळत आहे तर यांना कटकारस्थान रचविण्याचे कारण काय असा सवाल व सूचक विधान ओबीसी सेल चे विधानसभा अध्यक्ष (संदेश दादा ठाकरे) यांनी केले.
आर्वी मध्ये राजीनामे सत्र येत्या दिवसात अजूनदिसेल अशी चर्चा सर्व राजकीय वर्तुळात पसरली आहे
Maharashtra News Media सच की आवाज